शेंद्र्यात कंपनीला आग; लाखोंचे नुकसान
By Admin | Updated: June 23, 2014 00:33 IST2014-06-23T00:20:27+5:302014-06-23T00:33:41+5:30
करमाड : शेंद्रा एमआयडीसीमधील विद्युत ऊर्जा उत्पादन करणारी शेंद्रा ग्रीन एनर्जी कंपनीच्या आवारात असलेल्या वीज उत्पादन करणाऱ्या साहित्याला आग लागून लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.

शेंद्र्यात कंपनीला आग; लाखोंचे नुकसान
करमाड : शेंद्रा एमआयडीसीमधील विद्युत ऊर्जा उत्पादन करणारी शेंद्रा ग्रीन एनर्जी कंपनीच्या आवारात असलेल्या वीज उत्पादन करणाऱ्या साहित्याला आग लागून लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. ही घटना रविवारी सकाळी १०.३० वाजता घडली.
शेंद्रा एमआयडीसीमध्ये डी सेक्टरमध्ये १९७ क्रमांकाच्या प्लॉटवर शेंद्रा ग्रीन एनर्जी ही वीज उत्पन्न करणारी कंपनी आहे. वीज उत्पादन करण्यासाठी लागणारा भुसा कंपनीच्या आवारात मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवण्यात आला आहे.
या भुशाचा वापर करून विजेची निर्मिती करण्यात येते. वीज निर्मिती करणाऱ्या मशीनपर्यंत भुसा मशीनद्वारे पट्ट्याचा वापर करून नेण्यात येतो. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भुसा साठविला आहे. तेथून मशीनद्वारे बेल्टपट्टाद्वारे भुसा ओढण्यात येऊन तो मुख्य मशीनपर्यंत पोहोचला जातो. या भुशाच्या सुरुवातीलाच बेल्टपट्टा तुटल्याने याठिकाणी स्पार्किंग होऊन आग लागल्याचे समजते. त्यामुळे ही आग वाढत जाऊन कंपनीच्या आवारातील गंजी पेटत गेल्या. जोरात वाहणारी हवा व बारीक भुशाला आतून लागलेली आग त्यामुळे आग अधिकच भडकत गेली. शेंद्रा एमआयडीसीत अग्निशामक दलाची शाखा आहे.शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर चिकलठाणा व औरंगाबाद महानगरपालिकेचे अग्निशामक दल नेहमी तत्पर असते.
रविवारी सकाळी १०.३० वाजता ही आग लागली. त्यानंतर तब्बल अडीच तासांनंतर शेंद्रा एमआयडीसीतील अग्निशामक दलाला आगीबाबत माहिती देण्यात आल्याची माहिती अग्निशामक अधिकारी जगजितसिंग जाट यांनी सांगितले, तर याबाबत करमाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी सांगितले की, कंपनीला आग लागल्याबाबत आम्हाला दुपारी १२.३० वाजता माहिती मिळाली. आम्ही तात्काळ माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलो.
कंपनीचे प्रकल्प उपाध्यक्ष शिंदे यांना आगीबाबत विचारणा केली असता त्यांना माहिती देण्यास स्पष्टपणे नकार दिला. घटनास्थळी आगीबाबत कंपनीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गांभीर्य दिसून आले नाही; परंतु याठिकाणी एनआरबी कंपनीचे व्यवस्थापक पुजारी यांनी सौजन्य दाखवीत आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यामार्फत आग विझविण्यासाठी व बाजूला पेटलेले गवत पाणी टाकून विझवले. आग विझविण्यासाठी एमआयडीसी शेंद्रा, चिकलठाणा, बजाजच्या अग्निशामक बंबाचे कर्मचारी आग विझविण्यासाठी उशिरा रात्रीपर्यंत प्रयत्न करीत होते.