अनधिकृत बांधकाम प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:16 IST2019-04-01T23:16:01+5:302019-04-01T23:16:18+5:30
गोलवाडी परिसरात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अनधिकृत बांधकाम प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
वाळूज महानगर : सिडको अधिसूचित क्षेत्रात अनधिकृत रेखांकन व बांधकाम करणाऱ्याविरुद्ध प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरुच ठेवला आहे. गोलवाडी परिसरात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
वडगाव कोल्हाटी, शेकापूर, तीसगाव, वाळूज परिसरातील सिडको अधिसूचित क्षेत्रात परवानगी न घेता अनधिकृतपणे रेखांकन व बांधकाम करणाऱ्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
दरम्यान, सिडकोचे मालमत्ता अधिकारी गजानन साटोटे हे सुरक्षा रक्षक संतोष निकाळजे, किशोर बनसोडे, तारामती भिषे, पुष्पा पवार यांच्यासह २६ मार्च रोजी गोलवाडी शिवारात पाहणी केली. तेव्हा भूखंड क्रमांक ८६ वर अनधिकृत बांधकाम सुरु असल्याचे दिसून आले. या प्रकरणी साटोटे यांच्या तक्रारीवरुन अमित करवा व माधवी करवा यांच्याविरुद्ध २९ मार्च रोजी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.