नियम मोडणाऱ्यांकडून २४ हजार रुपये दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:07 IST2021-05-05T04:07:48+5:302021-05-05T04:07:48+5:30
नियमानुसार सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्यास दुकानांना परवानगी आहे. मात्र शहरातील काही किराणा व्यापारी व कापड ...

नियम मोडणाऱ्यांकडून २४ हजार रुपये दंड वसूल
नियमानुसार सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्यास दुकानांना परवानगी आहे. मात्र शहरातील काही किराणा व्यापारी व कापड व्यावसायिक वेळेनंतरही ग्राहकांना दुकानाच्या मागील बाजूने आत घेऊन व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, न.पा.चे मुख्याधिकारी बी.यू. बिघोत, पोनि. सम्राटसिंह राजपूत, उपमुख्याधिकारी राहुल साठे यांनी दुकानांवर कारवाई केली. या कारवाईत गंगापूर रस्त्यावरील अजित कलेक्शन या कापड दुकानाला १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. विशाल किराणा स्टोअर्सला चार हजार रुपये व अन्य दुकानदारांकडून १० हजार असा २४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. नगरपालिकेचे कर निरीक्षक गौतम गंगावणे, मिलिंद साळवे, सुनील भाग्यवंत, वाल्मिक वाणी, संजय जेजुरकर, कापसे, राजेंद्र खैरे, सुरेश शिंदे, मदन शेळके, पंढरीनाथ साळुंके, परेश रामय्या, इलियास खान, विनोद शिनगारे यांनी कारवाईत सहभाग नोंदवला.
फोटो : नियम मोडून दुकाने उघडे ठेवणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करताना पथक.
040521\1620131866-picsay_1.jpg
नियम मोडून दुकाने उघडे ठेवणाऱ्या व्यवसायिकांवर कारवाई करताना पथक.