अखेर शिक्षक समायोजनाला मुहूर्त सापडला !

By Admin | Updated: May 5, 2016 00:25 IST2016-05-05T00:18:25+5:302016-05-05T00:25:37+5:30

भालचंद्र येडवे ल्ल लातूर जिल्हा परिषदेअंतर्गत शाळांमधील गतवर्षीच्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाला अखेर मुहूर्त सापडला़ तालुका व जिल्हास्तर

Finally teacher adjustment was found. | अखेर शिक्षक समायोजनाला मुहूर्त सापडला !

अखेर शिक्षक समायोजनाला मुहूर्त सापडला !

भालचंद्र येडवे ल्ल लातूर
जिल्हा परिषदेअंतर्गत शाळांमधील गतवर्षीच्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाला अखेर मुहूर्त सापडला़ तालुका व जिल्हास्तर अशा दोन टप्प्यात १० मे पर्यंत अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया पार पडणार आहे.
लातूर जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शाळांतील पहिली ते आठवीच्या शिक्षकांचे समायोजन सन २०१५-१६ च्या संच मान्यतेनुसार केले जाणार आहे़ तालुकास्तरावर ६ मे पर्यंत अचूक समायोजन प्रक्रिया राबविण्याबाबत सर्व गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना सुचना आहेत़ तर ७ मे रोजी सकाळी ११ वाजता तालुकास्तरावर अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांची माहिती विहित प्रपत्रात संबंधित कार्यालयात सादर करावयाचे आहे़ सर्व तालुक्यांची माहिती संकलित झाल्यानंतर १० मे पर्यंत समायोजनाची प्रक्रिया पार पडेल. सन २०१५-१६ च्या मान्यतेनुसार जिल्ह्यात सह शिक्षकांची ११३ तर प्राथमिक पदवीधरांची २३ शिवाय, अन्य पदे मिळून सुमारे १५० अतिरिक्त पदांचे समायोजन तालुकास्तरावर होईल़
जिल्हास्तरावर १० मे पर्यंत समायोजन झाल्यानंतर ११ ते १३ मे पर्यंत जिल्हा स्तरावर सर्व साधारण बदल्या, तर २३ व २४ मे रोजी तालुकास्तरावर बदल्या होतील़

Web Title: Finally teacher adjustment was found.