शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अखेर मार्ग माेकळा, औरंगाबादेतील सिडको-हडकोतही गगनचुंबी इमारती उभारता येतील!

By मुजीब देवणीकर | Updated: November 12, 2022 19:39 IST

राज्य शासनाकडून ‘टीडीआर’ वापरण्यास मंजुरी

औरंगाबाद : सिडको - हडको भागात आजपर्यंत गगनचुंबी इमारती उभारण्यास परवानगी नव्हती. मात्र, आता जुन्या औरंगाबाद शहराप्रमाणेच सिडको, हडको भागातही उंच इमारती उभारता येतील. राज्य शासनाने या भागात विकास हक्क हस्तांतर (टीडीआर) वापरण्यास परवानगी दिली.

महाराष्ट्र शासनाने काही वर्षांपूर्वी नगर रचनाच्या कायद्यात अमूलाग्र बदल केले. औरंगाबाद शहरात ७० मीटरपर्यंत उंच इमारती बांधण्यास मुभा दिली. शासनाने ‘पेड एफएसआय’ २५ टक्के, त्यासोबत ॲन्सलरीचा वापर करण्यास ६० टक्के मुभा दिली. त्यामुळे अनेक बांधकाम व्यावसायिक ‘टीडीआर’ वापरतच नाहीत. मागील दीड ते दोन वर्षांत जुन्या औरंगाबाद शहरात ‘टीडीआर लोड’ होणे जवळपास बंद झाले. ‘टीडीआर’चे दर प्रचंड गडगडले. त्यामुळे ‘टीडीआर लॉबी’ प्रचंड अस्वस्थ झाली होती. मागील काही दिवसांपासून या लॉबीने सिडको - हडकोत ‘टीडीआर लोड’ करण्यास परवानगी द्यावी म्हणून राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्याला नुकतेच यश आले आहे.

शासनाने परवानगी दिल्यानंतर महापालिका प्रशासनानेही सिडको - हडकोत ‘टीडीआर लोड’ करण्यास मुभा दिली. सिडको - हडकोतही आता ७० मीटरपर्यंत उंच इमारती उभ्या राहू शकतील. ‘टीडीआर’पेक्षा ‘पेड एफएसआय’ वापरण्यावर नागरिक, बांधकाम व्यावसायिक अधिक भर देतील. त्यानंतरही गरज पडली, तर ‘टीडीआर’ वापरू शकतात, असे मनपाच्या नगररचना विभागाचे उपसंचालक ए. बी. देशमुख यांनी सांगितले.

इन्फ्रास्ट्रक्चर कोलमडणारसिडको प्रशासनाने १९८०च्या दशकात कामगारवर्गाला डोळ्यासमोर ठेवून घरांची निर्मिती केली. २००६मध्ये सिडको - हडकोचे मनपाकडे हस्तांतर करण्यात आले. मागील काही वर्षांत सिडकोच्या छोट्या जागांवरच दोन ते तीन मजली इमारती बांधण्यात आल्या. त्यामुळे या भागात आतापासून पार्किंग, ड्रेनेज व्यवस्था, पाणी आदी सोयी सुविधांवर प्रचंड ताण येत आहे. ‘टीडीआर लोड’ करण्याची परवानगी मिळाल्यावर काही प्रमाणात का होईना उंच इमारती उभ्या राहतील. नागरी सोयी सुविधांचा ताण अधिक वाढणार हे निश्चित.

अंमलबजावणीत अनेक अडचणीसिडको - हडकोचे मनपाकडे हस्तांतर झाले असले तरी या भागातील मालमत्ताधारक अद्याप सिडकोच्या रेकॉर्डनुसार ‘लिज होल्डर’ आहेत. सिडकोने अद्याप नागरिकांना फ्री होल्ड करून दिलेले नाही. शहरातील टीडीआर सिडकोत कोणत्या हिशेबाने वापरणार? टीडीआरचा हिशेब सिडको ठेवणार का? अगोदरच सिडको एक एफएसआय वापरण्यास परवानगी देते. मुळात कायद्यात १.१० एफएसआय वापरण्याची मुभा आहे. टीडीआर वापरण्यास सिडको एनओसी देणार का? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका