अखेर चंदनझिऱ्यात स्वतंत्र ठाणे

By Admin | Updated: August 22, 2014 00:57 IST2014-08-22T00:31:44+5:302014-08-22T00:57:24+5:30

चंदनझिरा : चंदनझिरा पोलिस ठाण्याचे उद्घाटन गुरुवारी सकाळी १० वाजता औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक अमितेशकुमार यांच्या हस्ते करण्यात आले.

Finally, a separate Thane in Chandanjirat | अखेर चंदनझिऱ्यात स्वतंत्र ठाणे

अखेर चंदनझिऱ्यात स्वतंत्र ठाणे




चंदनझिरा : चंदनझिरा पोलिस ठाण्याचे उद्घाटन गुरुवारी सकाळी १० वाजता औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक अमितेशकुमार यांच्या हस्ते करण्यात आले.
या परिसरामध्ये वाढत चाललेल्या गुन्हेगारी कारवाया थांबविण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. पोलिसांना नागरिकांचे सहकार्य असल्याशिवाय या गुन्हेगारीला आळा घालणे शक्य नाही. तक्रारकर्त्याची पोलिसांनीही दखल घेतली पाहिजे, असे मत अमितेशकुमार यांनी यावेळी व्यक्त केले.
पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सांगितले की, चंदनझिरा पोलिस ठाण्यांतर्गत २२ गावे तर १० उपनगरांचा समावेश होतो. शहरामध्ये पहिले तीन ठाणे होते. आता या ठाण्यांतर्गत येणारी गावे व उपनगरे या चंदनझिरा पोलिस ठाण्यांतर्गत येणार असल्याचे सांगितले. या परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत चालली होती. त्यामुळे पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आली असून यापुढे या भागातील गुन्हेगारीला आळा बसेल, असा विश्वास ज्योतिप्रिया सिंह यांनी यावेळी व्यक्त केला.
या ठाण्यांतर्गत चंदनझरा, बजाजनगर, नॅशनल नगर, नागेवाडी, शिक्षक कॉलनी, द्वारकानगर, रामतीर्थ, ढवळेश्वर, नविन मोंढा, कन्हैय्यानगर, हिंद नगर, तांदुळवाडी, खादगाव, आंबेडकरनगर, निधोना, मांडवा, सिंधी पिंपळगाव, तातेवाडी, मानदेऊळगाव, पिरपिंपळगाव, बावणे पांगरी, दगडवाडी, पठाण देऊळगाव, तुपेवाडी, आसरखेडा, हिवराराळा, आन्वी, नजीक पांगरी, चितोडा, आसोला, घाणेवाडी, गुंडेवाडी आदी गावांचा समावेश होतो. चंदनझिरा पोलिस ठाण्यात ३४ पोलिस कर्मचाऱ्यांचा स्टाफ राहणार आहे. या कार्यक्रमाला पोलिस उपअधीक्षक आय. व्ही. वसावे, पोलिस उपाधीक संदीपान कांबळे, विक्रांत देशमुख, चंदनझिरा पोलिस ठशण्याचे पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, सदर बाजारचे पोनि संतोष पाटील, पोनि विद्यानंद काळे, पोनि विभुते, माजी नगरसेवक गणेश राऊत, नगरसेवक जगन्नाथ चव्हाण, राधाकिसन दाभाडे, शांतीलाल राऊत, दाऊदभाई, रौफभाई, हबीम खान, रंगनाथ एकंडे, विजय खरात, प्रभाकर पवार, छगन लिंबोने आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Finally, a separate Thane in Chandanjirat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.