शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ठरलं... छत्रपती संभाजीनगरच्या महापौर, उपमहापौर निवडणूक १० फेब्रुवारीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 16:23 IST

पिठासन अधिकारी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची नेमणूक

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या २३ व्या महापौर, उपमहापौर पदांची निवडणूक मंगळवार, १० फेब्रुवारी रोजी होईल. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी निवडणुकीसंदर्भातील आदेश बुधवारी सकाळी काढले. या निवडणुकीसाठी महापालिकेत सर्व ११५ नगरसेवकांची विशेष सभा आयोजित करण्यात येईल. यावेळी पिठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे काम पाहतील, असे विभागीय आयुक्तांच्या आदेशात म्हटले आहे.

महापालिकेची निवडणूक १५ जानेवारी रोजी घेण्यात आली. १६ रोजी निकाल जाहीर झाले. त्यानंतर लगेचच महापालिकेने महापौर निवडणुकीसाठी विभागीय आयुक्तांकडे पत्र पाठवले होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमुळे महापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम लांबत गेला. बुधवारी विभागीय आयुक्तांनी निवडणुकीची तारीख, पिठासन अधिकाऱ्यांची नेमणूक केली. गुरुवार, २९ जानेवारी रोजी महापालिका सचिव विभाग निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करणार आहे. उमेदवारी अर्ज वाटप, अर्ज भरण्याची शेवटची तारीख निश्चित केली जाईल. महापालिकेत भाजपचे ५७ नगरसेवक निवडून आले आहेत. बहुमतासाठी भाजपला एका मताची गरज आहे. एमआयएमचे ३३, शिंदेसेनेचे १३, उद्धवसेनेचे सहा, वंचित बहुजन आघाडीचे चार तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार)चे प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आले आहेत.

भाजपमध्ये जोरदार स्पर्धामहापौर पदासाठी भाजपमध्ये जोरदार स्पर्धा सुरू असून, दोन ते तीनवेळा निवडून आलेले नगरसेवक स्पर्धेत आहेत. इच्छुक उमेदवारांनी स्थानिक आणि वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. उपमहापौरपद शिंदेसेनेला मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी अद्याप गटनेता निश्चित केलेला नाही. विभागीय आयुक्तांकडे गटाची नोंदणीसुद्धा करण्यात आलेली नाही. एमआयएम पक्षाला गटनेता आणि विरोधी पक्षनेता निवडावा लागणार आहे.

निवडणुकीसाठी प्रशासन सज्जमहापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी महापालिका प्रशासन सज्ज असून, सर्व पदाधिकाऱ्यांची दालने, त्यांना लागणारे कर्मचारी, महापौर बंगला, सर्वसाधारण सभेचे सभागृह नूतनीकरणासह सज्ज आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Chhatrapati Sambhajinagar Mayor, Deputy Mayor Election Set for February 10

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar's mayoral election is scheduled for February 10th. BJP needs one more vote for majority. Competition heats up within BJP for the Mayor post. The administration is prepared for the election.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक निकाल २०२६chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर