अखेर पालिकेला ‘सीओ’ मिळाले

By Admin | Updated: December 23, 2015 23:51 IST2015-12-23T23:25:45+5:302015-12-23T23:51:46+5:30

उस्मानाबाद : नगर परिषदेचे मुख्य अधिकाऱ्याचे पद मागील चार महिन्यापासून रिक्त होते. अखेर पालिकेला कायमस्वरुपी मुख्याधिकारी मिळाले आहेत.

Finally, the corporation got 'CO' | अखेर पालिकेला ‘सीओ’ मिळाले

अखेर पालिकेला ‘सीओ’ मिळाले


उस्मानाबाद : नगर परिषदेचे मुख्य अधिकाऱ्याचे पद मागील चार महिन्यापासून रिक्त होते. अखेर पालिकेला कायमस्वरुपी मुख्याधिकारी मिळाले आहेत. कराड नगर परिषदेचे प्रशांत रोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पालिकेचे तत्कालिन मुख्याधिकारी शशीमोहन नंदा यांच्या कारभाराविरुद्ध पदाधिकाऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांच्या कार्यकाळात गैरप्रकार वाढल्याच्या तक्रारी झाल्यानंतर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाला सादर करण्याचा ठराव मांडण्यात आला होता. मात्र तो पारित झाला नव्हता. त्यानंतर नंदा हे दीर्घ रजेवर गेले. त्यामुळे नायब तहसीलदार राजेश जाधव यांना प्रभारी मुख्याधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. प्रभारी अधिकाऱ्यामुळे पालिकेच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचे सांगत, आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे कायमस्वरुपी मुख्याधिकाऱ्याची मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही तातडीने मुख्याधिकारी देऊ, अशी ग्वाही आ. पाटील यांना दिली होती. त्यावर २३ डिसेंबर रोजी शासनाने स्वतंत्र आदेश काढत सातारा जिल्ह्यातील कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांची उस्मानाबाद नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी नियुक्ती केली आहे. ही बदली प्रशासकीय कारणास्तव केल्याचे आदेशात म्हटले आहे. सदरील बदली रद्द करणे अथवा त्यात बदल करण्यासाठी राजकीय दडपण/दबाव आणल्याचे निदर्शनास आल्यास संबंधिताविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे आदेशात नमूद केले आहे.

Web Title: Finally, the corporation got 'CO'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.