सिडको क्रीडा संकुलाचे काम अंतिम टप्यात

By Admin | Updated: May 19, 2014 00:19 IST2014-05-19T00:06:37+5:302014-05-19T00:19:21+5:30

डॉ़ बळीराम लाड, नांदेड राज्य क्रीडा धोरणातील नवीन तरतुदीनुसार गाव तेथे क्रीडांगण व क्रीडा विकासासाठी जिल्हा ऐवजी तालुका हा घटक करण्यात आला.

Final work of CIDCO Sports Complex | सिडको क्रीडा संकुलाचे काम अंतिम टप्यात

सिडको क्रीडा संकुलाचे काम अंतिम टप्यात

डॉ़ बळीराम लाड, नांदेड राज्य क्रीडा धोरणातील नवीन तरतुदीनुसार गाव तेथे क्रीडांगण व क्रीडा विकासासाठी जिल्हा ऐवजी तालुका हा घटक करण्यात आला. या योजनेनुसार जिल्ह्यातील ७ संकुलाची कामे पूर्ण झाली असून सिडको तालुका क्रीडा संकुलाचे काम अंतिम टप्यात आहे. तालुका क्रीडा संकुल योजनेतून तालुक्य्प्या ठिकाणी अद्यावत बॅडमिंटन हॉल, २०० मी. ट्रॅक (धावनपथ), कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल आदी खेळाची क्रीडांगण आदी कामे करण्यात येत आहेत. अर्धापूर, मुदखेड, किनवट, कंधार, लोहा, मुखेड, देगलूर आदी ठिकाणची कामे पूर्ण झाली असून सिडको तालुका क्रीडा संकुलाचे काम प्रगतीपथावर आहे. या ठिकाणी बॅडमिंटन हॉलचे व संरक्षीत भिंतीची वाढीव तरतूद झाल्याने याचे कामही पूर्ण झाले आहे. २०० मी. धावन पथाचे काम सुरू आहे. हडको, सिडको व परिसरातील ग्रामीण भागातील खेळाडूंना तालुका व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी मनपाचचया श्री गुरूगोविंदसिंघ स्टेडियमवर जावे लागायचे आता त्यांना जवळच क्रीडा सुविधा उपलब्ध झाल्याने खेळाडू, क्रीडाप्रेमी, क्रीडा शिक्षक यांच्यात आनंद व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील १६ तालुक्यात ८ तालुका क्रीडा संकुलात अद्यावत क्रीडांगण व बॅडमिंटन हॉल तयार झाली असून उर्वरीत ८ तालुक्यापैकी उमरी व बिलोली या ठिकाणी जागेअभावी क्रीडा संकुलाचे काम प्रलंबित आहे. लोहा-कंधार या ठिकाणी कायमचा तालुका क्रीडाधिकारी नियुक्त असून १४ तालुक्याला प्रभारी तालुका क्रीडा अधिकारी म्हणून जिल्हा क्रीडा कार्यालयातील तीन क्रीडाधिकारी यांना चार्ज देण्यात आलेला आहे. अद्यावत तालुका क्रीडा संकुलात क्रीडा सोयी-सुविधा उपलब्धतेबरोबर कायमचा तालुका क्रीडाधिकारी, क्रीडा मार्गदर्शक यांच्यासह लिपिक, शिपाई, ग्राऊन्डस्मन यांच्या नियुक्तीची मागणी क्रीडा क्षेत्रातून होत आहे.

Web Title: Final work of CIDCO Sports Complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.