कॅम्पस क्लब सदस्यता नोंदणी अंतिम टप्प्यात

By Admin | Updated: July 20, 2014 01:00 IST2014-07-20T00:40:33+5:302014-07-20T01:00:11+5:30

औरंगाबाद : लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब सदस्यता नोंदणीस ६ जुलैपासून सुरुवात झाली असून विद्यार्थी आणि पालकांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

The final stage of registration of campus club membership | कॅम्पस क्लब सदस्यता नोंदणी अंतिम टप्प्यात

कॅम्पस क्लब सदस्यता नोंदणी अंतिम टप्प्यात

औरंगाबाद : लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब सदस्यता नोंदणीस ६ जुलैपासून सुरुवात झाली असून विद्यार्थी आणि पालकांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावर्षी विद्यार्थ्यांसाठी सदस्यता नोंदणी फीस १५० रुपये ठेवण्यात आलेली असून एक आकर्षक इन्सुलेटेड वॉटर बॉटल भेट म्हणून देण्यात येत आहे. यासोबतच मुलांच्या वाढदिवसांच्या दिवशी शहरातील विविध शॉप्समध्ये १५०० रुपये किमतीचे कूपन्स देऊन वस्तू मोफत मिळतील. जसे रवि मसालेतर्फे २०० ग्रॅमची टोमॅटो के चप बॉटल, एच टू ओ वॉटर पार्कमध्ये एक वेळा प्रवेश मोफत, स्मोकिंग जोजतर्फे एक रेग्युलर पिज्जा मोफत, लोकसेवा स्टेशनर्सतर्फे ईअरली प्लॅनर, गो डॉट प्रिंटतर्फे एक किचन मोफत, अक्षर हँडरायटिंग अ‍ॅनॅलेसिसतर्फे एक सिग्नेचर बुक मोफत, कलर्स वेअरतर्फे एक पेन्सिल पाऊच, मिरर आर्ट गॅलरीतर्फे एक पॅलेट, सीके स्पोर्ट्सतर्फे एक स्मायली बॉल, साकला नर्सरीतर्फे एक रोपटे, पी.एम.सी. बँकेतर्फे बचत खाते, पॉवर सोल्युशनतर्फे एक बॉलपेन, चितलांगी गिफ्ट शॉपीतर्फे एक फॅन्सी इरेजर, किंग फिशतर्फे एक कार्ड होल्डर, असे विविध मोफत कूपन्स सदस्य होताच मुलांना मिळणार आहेत. या सोबतच लकी ड्रॉमध्ये वॉटर प्युरिफायर, पेन ड्राईव्ह, क्रिकेट बॅट, बॅडमिंटन रॅकेट, फीश टँक्स, गॉगल्स, ब्रँडेड टी शर्ट, टॅब्लेट, स्कूल बॅग्ज यासारख्या वस्तू जिंकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
चित्रकला स्पर्धा
कॅम्पस क्लबतर्फे लवकरच शहरातील विविध शाळांमध्ये २७ जुलै रोजी भव्य चित्रकला स्पर्धा अयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत फक्त कॅम्पस क्लब सदस्यांना भाग नोंदविता येईल, तसेच यानंतर पुढील महिन्यात रॅपीड चेस टूर्नामेंट, देशभक्तीपर गीत स्पर्धा याचेही अयोजन क रण्यात येणार आहे. लोकमत भवन येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत सदस्यता नोंदणी करता येईल.
कॅम्पस चॅम्प आपल्या शाळेत
कॅम्पस क्लबतर्फे शहरातील विविध शाळांमध्ये ‘कॅम्पस चॅम्प आपल्या शाळेत’ हा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम आपल्या शाळेत घेण्यासाठी व सदस्या नोंदणीसाठी ९९२१०३०७०० या क्रमांकावर संपर्क करता येईल.

Web Title: The final stage of registration of campus club membership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.