पापाचा भरलाय घडा, पण कुणाच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:02 IST2021-06-19T04:02:12+5:302021-06-19T04:02:12+5:30

२० महिन्यांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. भाजपसोबत शिवसेनेचे काही पटले नाही. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेनेेने बस्तान ...

Filled with sin, but of whom | पापाचा भरलाय घडा, पण कुणाच्या

पापाचा भरलाय घडा, पण कुणाच्या

२० महिन्यांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. भाजपसोबत शिवसेनेचे काही पटले नाही. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेनेेने बस्तान मांडून सरकार स्थापन केले. सरकार स्थापनेची बहुमताची गोळाबेरीज भाजपला काही पचनी पडली नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी भाजप सरकारवर टीका करण्याची संधी सोडत नाही. भाजपच्या माजी मंत्र्यांनी शुक्रवारी मराठवाडा वॉटर ग्रीडच्या अनुषंगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारविरोधात वक्तव्ये केली. अभिनेत्री कंगना रनौत आणि पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्यासाठीच आजवरचा कार्यकाळ गेला असून, आता पापाचा घडा भरला आहे. रनौत आणि गोस्वामी तर भाजपचेच आहेत. त्यामुळे कुणाच्या पापाचा घडा भरलाय, त्या दोघांचा की सरकारचा, असा प्रश्न पत्रकारांनी करताच माजी मंत्र्यांनी मात्र वाणीला पूर्णविराम दिला.

(कुजबूज कॉलमसाठी)

Web Title: Filled with sin, but of whom