मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:07 IST2021-01-08T04:07:48+5:302021-01-08T04:07:48+5:30
औरंगाबाद : विभागातील सर्व पात्र अनुसूचित जाती, विजा-भज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे नूतीनकरणाव्दारे अर्ज भरून महाविद्यालयांमार्फत समाजकल्याण विभागाकडे ...

मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरा
औरंगाबाद : विभागातील सर्व पात्र अनुसूचित जाती, विजा-भज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे नूतीनकरणाव्दारे अर्ज भरून महाविद्यालयांमार्फत समाजकल्याण विभागाकडे मंजुरीसाठी पाठवावे लागणार आहेत. मागास प्रवर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी महाविद्यालयांच्या प्राचार्यांवर असेल, असे समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त जलील शेख यांनी कळविले आहे.
आधार क्रमांक लिंक करण्याचे आवाहन
औरंगाबाद : एनपीसीआय मॅपव्दारे ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड क्रमांक लिंक झालेले नाहीत, त्या विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालयांना ई-मेलव्दारे समाज कल्याण विभागाने पेन ड्राइव्हमध्ये व व्हाॅट्सअॅप ग्रुपवर दिलेली आहे. अशा महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना आपले आधार क्रमांक एनपीसीआय मॅपव्दारे बँकेशी लिंक करून घ्यावे, असे आवाहन प्राचार्यांना समाज कल्याण सहायक आयुक्तांनी केले आहे.
शहरचिटणीसपदी धुमाळ यांची नियुक्ती
औरंगाबाद : भाजपच्या शहर जिल्हा चिटणीसपदी संतोष धुमाळ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहर जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी धुमाळ यांना नियुक्तीचे पत्र दिले. या नियुक्तीचे पक्ष लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे.
शहाजीराजे भोसले स्मारकासाठी निधी ठेवणार
औरंगाबाद : वेरूळ येथील स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या स्मारकाच्या सुशोभिकरणाचे काम लवकरच हाती घेण्यात येईल. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीत निधीची तरतूद करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.
सिटी सेंटर म्हणून जागा विकसित करणार
औरंगाबाद : शासकीय सुभेदारी विश्रामगृह आणि शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयालगत असलेल्या जागेचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. सिटी सेंटर म्हणून ती जागा विकसित करण्यासाठी नियोजन समितीतून तरतूद होणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.