अवैध प्लॉटिंग करणाऱ्या ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:46 IST2019-04-12T23:46:27+5:302019-04-12T23:46:38+5:30
अनधिकृत प्लॉटिंग करुन विक्री करणाºया ७ जणांविरुद्ध गुरुवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध प्लॉटिंग करणाऱ्या ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
वाळूज महानगर : सिडको अधिसूचित क्षेत्रात येणाºया तीसगाव व शेकापूर शिवारात अनधिकृत प्लॉटिंग करुन विक्री करणाºया ७ जणांविरुद्ध गुरुवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिडको अधिसूचित क्षेत्रात काहींनी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी करुन बनावट ले-आउट तसेच नियमबाह्यपणे गावठाण प्रमाणपत्र घेऊन भूखंड व घराची विक्री सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर सिडकोचे सहाय्यक वसाहत अधिकारी गजानन साटोटे यांनी पथकासह डिसेंबर महिन्यात सिडको अधिसूचित क्षेत्रातील गावात पाहणी केली होती.
तेव्हा तीसगाव शिवारातील गट क्रमांक २१७ मध्ये श्री स्वामी समर्थ हौसिंग सोसायटीचे हनुमान अश्राजी जरांगे, पुरुषोत्तम अंभोरे व अरविंद मोहनसिंग यांनी अनधिकृत प्लॉटींग पाडून भुखंडाची विक्री केल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. याचप्रमाणे शेकापूर शिवारातील गट क्रमांक ५ मध्ये कृष्णा डेव्हलपर्सचे राजकुमार, शेख राजू हबीब, मारुती बबन मेंढे व उमेश दुधाट यांनीही अनधिकृत प्लॉटिंग पाडून भुखंडाची विक्री केल्याचे समोर आले. संबंधितांना नोटीस बजावण्यात आली.
त्यानंतर खुलासा सादर करण्यासाठी कालावधी देण्यात आली. त्यानंतीर संबंधितांचे उत्तर न आल्याने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या प्रकरणी सिडकोचे सहायक वसाहत अधिकारी गजानन साटोटे यांच्या तक्रारीवरुन उपरोक्त ७ जणांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हे दखल करण्यात आले आहे.