विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह दिराविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 23:38 IST2019-07-08T23:37:57+5:302019-07-08T23:38:07+5:30

विवाहितेचा छळ करणाºया पतीसह दिराविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Filing a complaint against a husband who harasses his spouse | विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह दिराविरुद्ध गुन्हा दाखल

विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह दिराविरुद्ध गुन्हा दाखल

वाळूज महानगर : घर बांधण्यासाठी माहेरहून ५ लाख रुपये घेवून ये असे म्हणून २९ वर्षीय विवाहितेचा छळ करणाºया पतीसह दिराविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वैशाली राजू वायघोळ (२९, रा. जोगेश्वरी) हिचे २००३ मध्ये राजू रायघोळ (रा. जोगेश्वरी) याच्याशी लग्न झाले. या दांपत्याला २ मुले आहेत. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस पती राजू याने वैशाली हिला चांगले वागविले. त्यानंतर घर बांधण्यासाठी माहेरहून ५ लाख रुपये घेवून ये असा तगादा लावला. मागणी पूर्ण न केल्याने राजूने वैशालीचा छळ सुरु केला.

दरम्यान, प्लॉट घेण्यासाठी राजूला वैशालीच्या वडिलांनी ६० हजार रुपये दिले. त्यानंतर आणखी मागणी करीत राजूने ५ जुलै रोजी सकाळी वैशालीला घरातून हाकलून दिले. वैशालीने सोमवारी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती राजू वायघोळ व दीर विजयविरुद्ध तक्रार दिली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात दोघा भावा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Filing a complaint against a husband who harasses his spouse