कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:05 IST2021-07-16T04:05:56+5:302021-07-16T04:05:56+5:30

वाळूज महानगर : दुचाकीस्वारास धडक देऊन जखमी करणाऱ्या फरार कंटेनरचालकाविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश ...

Filed a crime against the container operator | कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

वाळूज महानगर : दुचाकीस्वारास धडक देऊन जखमी करणाऱ्या फरार कंटेनरचालकाविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश निवृत्ती कुमकर (२७, रा. बजाजनगर) हे १० जुलै रोजी दुचाकीने (क्र. एमएच १२, केएक्स ९६०१) जात असताना नगररोडवर त्यांच्या दुचाकीला कंटेनरने (क्र. सीजी ०७, सीए ४६८२) धडक दिली होती. या अपघातात जखमी झालेल्या योगेश कुमकर यांनी उपचारानंतर पोलीस ठाण्यात फरार कंटेनरचालकाविरुद्ध तक्रार दिली आहे.

---------------------

रांजणगाव रोडवर धोकादायक खड्डा

वाळूज महानगर : पंढरपूर-रांजणगाव रोडवर बसस्थानकालगत धोकादायक खड्डा पडला असून, या खड्ड्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर पडलेला खड्डा रात्रीच्या वेळी वाहनधारकांना दिसत नसल्याने खड्ड्यात वाहने आदळून वाहनाचे नुकसान होत आहे. या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने हा धोकादायक खड्डा बुजविण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे.

-----------------------

फरार वाहनचालकाविरुद्ध गुन्हा

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीत मोपेडस्वारास धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या फरार वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाऊपाटील चिमनराव चिने (५७, रा.रांजणगाव) हे १२ जुलै रोजी मोपेडने घरी जात असताना एनआरबी चौकात त्यांना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली होती. गंभीर जखमी भाऊपाटील चिने यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. विजय चिने याच्या तक्रारीवरून फरार वाहनचालकाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------

दत्त कॉलनीत पावसाचे पाणी साचले

वाळूज महानगर : वाळूजच्या दत्त कॉलनीसमोरील मोकळ्या भूखंडावर पावसाच्या पाण्याचे तळे साचले आहे. या परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे भूखंडावर पाण्याचे तळे साचले असून, रस्त्यावरून पाणी वाहत असते. या पाण्यामुळे मोकाट जनावरांचा संचारही वसाहतीत वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पाणी वाहून जाण्यासाठी नाली नसल्याने या ठिकाणी पाणी साचत असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे.

--

सिडको जलवाहिनी रस्त्याची दुरवस्था

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील जलवाहिनी रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांना आदळ-आपटीचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधून पाण्याची गळती होत असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर खड्डे बुजविण्याची मागणी सुमित शेलार, सुनील जोगदंड, अशोक नरवडे आदींनी केली आहे.

-----------------------------

Web Title: Filed a crime against the container operator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.