बनावट कागदपत्राधारे नोकरी मिळविणाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल

By Admin | Updated: July 3, 2014 00:18 IST2014-07-02T23:46:00+5:302014-07-03T00:18:23+5:30

अहमदपूर : शैैक्षणिक कागदपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने अहमदपूर न्यायालयाने चौघाविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Filed a copy against a job seeking fake documents | बनावट कागदपत्राधारे नोकरी मिळविणाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल

बनावट कागदपत्राधारे नोकरी मिळविणाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल

अहमदपूर : शैैक्षणिक कागदपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने अहमदपूर न्यायालयाने या कागदपत्राधारे नोकरी मिळविणाऱ्यास व त्याला सहकार्य करणाऱ्या चौघाविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने अहमदपूर पोलिस ठाण्यात नोकरदारासह अन्य चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी सांगितले की, अहमदपूर शहरातील फत्तेपुरा येथील सय्यद पाशा सय्यद अली याने वासीम येथील जिल्हा परिषद शाळेची १० वी पासची टि़सी़व मार्क मेमो तयार करून अहमदपूर नगर पालिकेत तृतीय श्रेणीची नोकरी मिळविली़ यासाठी पाशा यांना गुणवंत सांबाप्पा मेनकुदळे, रा़भोडगा रोड अहमदपूर, शेख निजायोद्दीन, आजम नूर कॉलनी अहमदपूर, सतीश गोविंदराव बिलापट्टे, रा़हनुमान मंदिर जवळ अहमदपूर (हे सर्व नगर पालिकेतील कर्मचारी) यांनी सहकार्य केले़ त्यानंतर कांही दिवसांनी आसद रफीयोद्दीन तांबोळी, रा़ दर्गापूरा, अहमदपूर यांनी पाशा यांच्या शैक्षणिक कागदपत्रांवर आक्षेप घेऊन ते कागदपत्र खोटे असल्याचा खटला दाखल केला़ न्यायालयासमोर या खटल्याची सुनावणी झाली़ तेव्हा शैक्षणिक कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले़ त्यामुळे न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले़ त्यावरुन वरील ५ जणां विरूध्द गु़ऱनं़१७३/०१४ कलम ४६४, ४६५, ४७२, ४२०, १२० (३), १९३, २०३, ३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
या घटनेचा पुढील तपास पी़एस़आय सोनटक्के हे करीत आहेत़ सदरील प्रकरण अ‍ॅड़बी़बी़क्षीरसागर यांच्या मार्फत कोर्टात दाखल केले होते़ अ‍ॅड़क्षीरसागर यांना अ‍ॅड़सोपान शिवणे यांनी सहकार्य केले़(वार्ताहर)

Web Title: Filed a copy against a job seeking fake documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.