आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:15 IST2017-08-10T00:15:16+5:302017-08-10T00:15:16+5:30

गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या किशोर पाराशर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिक्षण उपसंचालक वैजीनाथ खांडके आणि अन्य एका महिला कर्मचाºयांविरुद्ध एमआयडीसी सिडको ठाण्यात बुधवारी गुन्हा नोंदविण्यात आला

 Filed a complaint of suicidal tendencies | आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या किशोर पाराशर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिक्षण उपसंचालक वैजीनाथ खांडके आणि अन्य एका महिला कर्मचाºयांविरुद्ध एमआयडीसी सिडको ठाण्यात बुधवारी गुन्हा नोंदविण्यात आला. शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकाºयावर गुन्हा नोंदविण्याच्या मागणीसाठी मृताच्या नातेवाईकांनी बुधवारी सकाळी घाटी रुग्णालयात तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी केली. घाटीत काही काळ तणाव निर्माण झाला होता.
खांडके यांच्यासह घोरपडे नावाच्या एका महिला कर्मचाºयाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याविषयी अधिक माहिती देताना सिडको पोलिसांनी सांगितले की, शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक किशोर पाराशर (रा. उत्तरानगरी) यांनी मंगळवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांचे शवविच्छेदन बुधवारी सकाळी घाटी रुग्णालयात करण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नीसह नातेवाईक आणि मित्र, शेजाºयांनी घाटीत गर्दी केली. यावेळी किशोर पाराशर यांच्या पत्नी दीपाली यांनी आरोप केला की किशोर यांच्या कार्यालयातील उपसंचालक वैजीनाथ खांडके यांनी किशोर यांना वेळोवेळी मानसिक त्रास दिला. चार कर्मचाºयांचे काम त्यांच्याकडे सोपविले. एवढेच नव्हे तर सकाळी १० ते रात्री १० असे बारा तास त्यांच्याकडून काम करवून घेण्यात आले. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही त्यांना कार्यालयात बोलावून घेत. घोरपडे नावाच्या महिलेचे काम त्यांना करण्यास सांगितले जात असे. दिवस-रात्र काम केल्यानंतरही किशोर यांचे जुलै महिन्याचे वेतन खांडके यांनी थांबविले. आरोपींनी त्यांना वेतनवाढ रोखण्याची धमकी दिली. खांडके यांच्या सततच्या छळाला कंटाळून किशोर यांनी आत्महत्या केल्याची तक्रार दीपाली यांनी एमआयडीसी सिडको पोलिसांकडे नोंदविली.

Web Title:  Filed a complaint of suicidal tendencies