शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

संचिका तुंबल्या; नगरसेवकांचा ठिय्या

By admin | Updated: November 29, 2014 00:30 IST

औरंगाबाद : विकासकामांच्या संचिका तुंबल्यामुळे विरोधी पक्षातील नगरसेवकांनी आज पालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच सायं. ६ वा. ठिय्या दिला.

औरंगाबाद : विकासकामांच्या संचिका तुंबल्यामुळे विरोधी पक्षातील नगरसेवकांनी आज पालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच सायं. ६ वा. ठिय्या दिला. आयुक्त पी.एम. महाजन यांनी तत्कालीन आयुक्त डॉ. कांबळे यांच्यासारखाच मनपात न येता बंगल्यावर अथवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रातूनच प्रशासकीय कारभार सुरू केल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. नगरसेवक प्रमोद राठोड, कृष्णा बनकर, विजेंद्र जाधव, अमित भुईगळ, मिलिंद दाभाडे यांनी विकासकामांच्या संचिका तुंबल्यामुळे आयुक्तांविरोधात घोषणा देऊन ठिय्या दिला. अभ्यागतांच्या वेळेत तरी आयुक्त व इतर अधिकाऱ्यांनी मनपात असले पाहिजे. अनेक नागरिक आयुक्तांची वाट पाहत बसले होते. नगरसेवक, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचा आयुक्त फोन घेत नाहीत, असे आरोप नगरसेवकांनी केले. दरम्यानच्या काळात आयुक्तांनी बंगल्यावर अधिकाऱ्यांची बैठक लावली होती. त्यामुळे आयुक्त पालिकेत आले नाहीत. सभापती विजय वाघचौरे, नगरसेवक काशीनाथ कोकाटे, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, उपायुक्त किशोर बोर्डे यांनी मध्यस्थी करून नगरसेवकांचा ठिय्या सोडविला. नगरसेवक म्हणतात...नगरसेवक कृष्णा बनकर म्हणाले की, १९ नोव्हेंबर रोजी विकासकामांच्या संचिकांसाठी आयुक्तांना पत्र दिले आहे. अजून त्यावर काहीही निर्णय झालेला नाही. नगरसेवक प्रमोद राठोड म्हणाले की, आयुक्त हुकूमशाही पद्धतीने वागत आहेत. नागरिक त्यांची वाट पाहून निघून गेले आहेत. त्यांनी सर्वाधिकार स्वत:कडे ठेवले आहेत. त्यांना वेळ नसेल तर त्यांनी अतिरिक्त आयुक्तांकडे काही अधिकार दिले पाहिजेत. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी लाकूड पुरवठा केला जात नाही. कारण त्यांची बिले अदा केलेली नाहीत. नगरसेवक दाभाडे म्हणाले की, सहा महिन्यांपासून संचिका तुंबल्या आहेत. आयुक्त नागरिकांचा अंत पाहत आहेत. त्यांची ही दादागिरी आहे. नगरसेवक अनिल जैस्वाल म्हणाले की, अनेक कामे सुरू होऊन अर्धवट पडली आहेत. जी कामे मंजूर आहेत, त्यांचा तरी विचार होणे गरजेचे आहे.