शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सिल्लोडमधून जन्मप्रमाणपत्र काढलेल्या ४०६ जणांवर गुन्हे दाखल करा; सोमय्यांची पोलीसांत तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 18:54 IST

आमची लढाई सरकारी कर्मचाऱ्यांसोबत नाही तर बांगलादेशी रोहिंग्याशी आहे: किरीट सोमय्या

सिल्लोड : तालुक्यात ४०६ जणांनी फक्त आधारकार्डचा पुरावा देऊन जन्म प्रमाणपत्र काढले आहे. त्या ४०६ जणांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज येथील शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जानेवारी महिन्यामध्ये जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये १० हजारांहून अधिक तर सिल्लोड तालुक्यांमध्ये ४ हजार ७३० बांगलादेशी नागरिक राहत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आज, मंगळवारी दुपारी सोमय्या सिल्लोड येथील उपविभागीय कार्यालयात दाखल झाले. त्यांनी उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार तहसीलदार संजय भोसले यांच्याशी चर्चा करून किती जणांना प्रमाणपत्र दिले, काय पुरावे घेतले याची चौकशी केली. त्यानंतर सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे यांच्याकडे त्यांनी याबाबत तक्रार दाखल केली. यावेळी भाजपचे प्रदेश चिटणीस सुरेश बनकर, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मोठे, तालुकाध्यक्ष अशोक गरुड, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल  मिरकर, शहराध्यक्ष कमलेश  कटारिया, माजी नगरसेवक मनोज मोरेलू, विष्णू काटकर, नारायण बडक आदींची उपस्थिती होती.

आमची लढाई सरकारी कर्मचाऱ्यांसोबत नाहीयानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की ,जन्माचे दाखले देणे म्हणजे नागरिकत्व देणे. मात्र हे प्रमाणपत्र देताना सबळ पुरावे घेणे प्रशासनाचे काम होते. त्यामुळे प्रशासनाने देशाच्या सुरक्षेशी खेळण्याचा प्रयत्न केला. पुरावाच नाही तर प्रमाणपत्र कसे दिले. हा देशाशी केलेला अपराध आहे. देशभर बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी रोहिंगे राहत आहेत. आमची लढाई सरकारी कर्मचाऱ्यांशी नसून बांगलादेशी रोहिंग्याशी आहे. सिल्लोडमध्ये कागदपत्रांची शहानिशा न करता फक्त आधार कार्डच्या आधारे ४०६ लोकांना जन्मप्रमाणपत्र दिले. तहसील कार्यालयाने प्रमाणपत्र देण्याचे दुकान उघडले आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरKirit Somaiyaकिरीट सोमय्याBangladeshबांगलादेश