किरकोळ कारणावरून तिघांमध्ये हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:02 IST2021-05-05T04:02:21+5:302021-05-05T04:02:21+5:30

दीक लक्ष्मण पवार (रा. ल बंजारा कॉलनी) आणि रवींद्र मल्हारी ढंगारे (वय २७, रा. नवनाथनगर) हे रविवारी सायंकाळी क्रांती ...

Fighting between the three for petty reasons | किरकोळ कारणावरून तिघांमध्ये हाणामारी

किरकोळ कारणावरून तिघांमध्ये हाणामारी

दीक लक्ष्मण पवार (रा. ल बंजारा कॉलनी) आणि रवींद्र मल्हारी ढंगारे (वय २७, रा. नवनाथनगर) हे रविवारी सायंकाळी क्रांती चौकात हातगाडीवर बिर्याणी खात होते. यावेळी तेथे रिजवान उलहक इमरान उलहक (रा. चंपा चौक) हा बिर्याणी खाण्यासाठी आला होता. यावेळी बाजूला सरकण्याच्या आणि धक्का लागल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रिझवान याने चाकू मारला, तर दीपक आणि रवींद्र यांनी दगडाने मारहाण केल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत नोंदविली.

======================

मोटारसायकल पळविली

औरंगाबाद : शहागंज भाजीमंडी येथे उभी केलेली मोटारसायकल (एमएच २० डी आर१५३७) चोरट्याने पळविली. २५ एप्रिल रोजी सकाळी ही घटना झाली. याविषयी अब्दुल रफत अब्दुल रउफ यांनी सिटी चौक ठाण्यात तक्रार नोंदविली.

=====================

जुन्या वादातून शेजाऱ्याला मारहाण

औरंगाबाद : जुन्या वादातून भीमराव विष्णू हिवराळे (२६, रा. एकतानगर) यांना शेजारील तीनजणांनी मारहाण करून जखमी केले. ही घटना २ मे रोजी रात्री साडेसात वाजता झाली. या घटनेत भांडण सोडविण्यासाठी आलेल्या तक्रारदार यांच्या मित्रालाही राजेश साळवे आणि दोन महिलांनी मारहाण केली. याविषयी हिवराळे यांनी हर्सूल ठाण्यात तक्रार नोंदविली.

Web Title: Fighting between the three for petty reasons