भरधाव जीपच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 21:54 IST2019-05-13T21:54:40+5:302019-05-13T21:54:50+5:30
शिर्डीकडून नांदेडकडे जाणाऱ्या भरधाव जीपने समोरुन येणाºया दुचाकीला जोराची धडक दिल्याची घटना रविवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास खोजेवाडी फाट्यावर घडली.

भरधाव जीपच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
वाळूज महानगर : शिर्डीकडून नांदेडकडे जाणाऱ्या भरधाव जीपने समोरुन येणाºया दुचाकीला जोराची धडक दिल्याची घटना रविवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास खोजेवाडी फाट्यावर घडली. या अपघातात दुचाकीस्वार विशाल संजय हिवाळे याचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर जीपचालक फरार झाला आहे.
विशाल संजय हिवाळे (२७, रा.फुलशेवरा) याचे रांजणगाव शेणपुंजी येथे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे. दुकान बंद करुन रविवारी रात्री विशाल दुचाकीने (एम.एच.२०, ई.टी.०२३३) फुलशेवरा येथे जाण्यासाठी निघाला. मुंबई-नागपूर महामार्गावरुन फुलशेवराकडे जात असताना रात्री ९.३० वाजेच्या सुमारास लासूरकडून औरंगाबादच्या दिशेने भरधाव जीपने (एम.एच.२६-व्ही.५२९३) खोजेवाडी फाट्याजवळ विशालच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात विशाल गंभीर जखमी झाला.
त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून विशालला मृत घोषित केले. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार जीपमध्ये नांदेड परिसरातील भाविक प्रवास करीत होते. शिर्डी येथून दर्शन घेऊन नांदेडकडे परतत असताना हा अपघात घडला. घटनेनंतर जीपचालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.