फेस्टिव्ह आर्ट कॉम्पिटिशन उत्साहात

By Admin | Updated: December 29, 2014 01:08 IST2014-12-29T01:02:08+5:302014-12-29T01:08:31+5:30

औरंगाबाद : विद्यार्थ्यांनी लोकमत टाइम्स कॅम्पस क्लबच्या वतीने आयोजित फेस्टिव्ह आर्ट कॉम्पिटिशनमध्ये दाखविले़ या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला़

In the festive art competition enthusiasm | फेस्टिव्ह आर्ट कॉम्पिटिशन उत्साहात

फेस्टिव्ह आर्ट कॉम्पिटिशन उत्साहात

औरंगाबाद : पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून आपली कला सादर करण्याचे औचित्य विद्यार्थ्यांनी लोकमत टाइम्स कॅम्पस क्लबच्या वतीने आयोजित फेस्टिव्ह आर्ट कॉम्पिटिशनमध्ये दाखविले़ या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला़
ही स्पर्धा लोकमत भवन, जालना रोड येथे उत्साहात झाली़ यास नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला़ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेतील सजावटीसाठी फुले, पाने, मोती, कागद व रंगांचा वापर करून आकर्षक सादरीकरणाचा प्रयत्न केला़ ही स्पर्धा तीन गटांत घेण्यात आली़ पहिला गट नर्सरी ते सिनिअर के.जी.च्या विद्यार्थ्यांसाठी रंग भरण्याची स्पर्धा घेण्यात आली़ यात मुलांनी अतिशय कल्पकतेने सांताक्लॉजच्या हातात ख्रिसमस ट्री असलेले छायाचित्र रंगविले़ सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांपैकी एकूण ३ विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. दुसऱ्या गटातील पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना ग्रीटिंग कार्ड बनवायचे असल्याने विद्यार्थ्यांनी आपल्याजवळ उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून आकर्षक ग्रीटिंग कार्ड तयार केले, तर तिसऱ्या गटातील विद्यार्थ्यांना पॉट डेकोरेशन करायचे असल्याने विद्यार्थ्यांनी प्लेन पॉट आणून त्यावर मोती, स्टोन, टिकल्यांचा वापर करून त्यांची सजावट केली़
या गटातील मुलांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सादरीकरण केले असल्याने परीक्षकांच्या सूचनेनुसार उत्तेजनार्थ पारितोषिकेही देण्यात आली़ तसेच पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून आक र्षक ग्रीटिंग कार्ड बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी स्केचपेन, कागद़, रंगीबेरंगी फुले, पाने, डाळी, गहू, मोहरी तसेच मसाल्याच्या पदार्थांचा वापर करून आकर्षक ग्रीटिंग कार्ड बनविले़ या स्पर्धेतही स्पर्धकांचे सादरीकरण पाहून उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली़
पाचव्या व शेवटच्या गटात आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पेपरच्या साहाय्याने ख्रिसमस ट्री बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली़ स्पर्धकांना आयोजकांकडून सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले़ या स्पर्धेचे परीक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कलावंत रविराज नेरकर व जळगाव येथील युवा चित्रकार सचिन मुसळे यांनी केले़

Web Title: In the festive art competition enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.