नव्या योजनेचे पाणी मिळणार का, याविषयी प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:27 IST2020-12-17T04:27:35+5:302020-12-17T04:27:35+5:30
सुरुवातीचे दोन वर्षे सोडली तर औरंगाबादची महानगरपालिका ही आजपर्यंत शिवसेनेचीच आहे. आता योगायोगाने सरकार तीन पक्षांचे असले तरी ...

नव्या योजनेचे पाणी मिळणार का, याविषयी प्रतिक्रिया
सुरुवातीचे दोन वर्षे सोडली तर औरंगाबादची महानगरपालिका ही आजपर्यंत शिवसेनेचीच आहे. आता योगायोगाने सरकार तीन पक्षांचे असले तरी मुख्यमंत्री शिवसेनेचेच आहेत. त्यामुळे आतातरी त्यांना औरंगाबादकरांना दिलेले वचन पूर्ण करावेच लागेल. औरंगाबादचे नागरिक पाण्यासाठी आसुसलेले आहेत. याच मुद्द्यावर जवळपास २५ वर्षे सत्तेत असणाऱ्या खासदारांनाही पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आतातरी काम होईल, अशी सामान्यांची अपेक्षा वाढलेली आहे.
- शेख वाहेद शहानूर
---------
२. जलदगतीने काम करावे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद शहरासाठी नव्या पाणी योजनेचे भूमिपूजन केले आहे. ही शहरासाठी आनंदाचीच बाब असून यासाठी मुख्यमंत्र्यांना औरंगबादकरांकडून धन्यवाद. पण आता ही योजना तिथेच न थांबता जलदगतीने पूर्ण व्हावी, हे आव्हान औरंगाबाद शहराच्या लोकप्रतिनिधींसमोर असणार आहे. राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून पाणी योजनेचे काम पूर्ण करावे, ही औरंगाबादकरांची अपेक्षा आहे.
- जॉन भालेराव
------------
३. योजना प्रत्यक्षात यावी
औरंगाबाद महानगरपालिकेत मागील २० वर्षांपासून शिवसेना- भाजप युती सत्तेत होती. युतीनेच मागील काही वर्षे राज्याचा कारभार पाहिला. पण तरीही पाणीयोजनेवर या काळात कोणतेही प्रभावी काम होऊ शकले नव्हते. आता फक्त एका घोषणेवर सर्व काही सुरळीत, छान होणार असे चित्र उभे केले जात आहे. हे चित्र प्रत्यक्षात उतरावे, असेच आता औरंगाबादकरांना वाटते.
- सना फरहीन