संक्रांतीच्या उत्साहापुढे हरली कोरोनाची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:02 IST2021-01-16T04:02:17+5:302021-01-16T04:02:17+5:30

सकाळी ९ वाजेपासूनच शहरातील विविध मंदिरांमध्ये संक्रांतीचे वाण देण्यासाठी महिलांची मोठी गर्दी दिसून आली. धावणी मोहल्ला येथील विठ्ठल मंदिर, ...

Fear of Harley Corona in the face of Sankranti excitement | संक्रांतीच्या उत्साहापुढे हरली कोरोनाची भीती

संक्रांतीच्या उत्साहापुढे हरली कोरोनाची भीती

सकाळी ९ वाजेपासूनच शहरातील विविध मंदिरांमध्ये संक्रांतीचे वाण देण्यासाठी महिलांची मोठी गर्दी दिसून आली. धावणी मोहल्ला येथील विठ्ठल मंदिर, एन-९ येथील रेणुकादेवीचे मंदिर, गारखेडा येथील ओंकारेश्वर मंदिर यासह सगळीच देवस्थाने आणि विशेषत: विठ्ठलाची मंदिरे महिलांच्या गर्दीने फुलून गेली होती. कोरोनापासून संरक्षण म्हणून मास्क लावून आणि सॅनिटायझर घेऊनच महिला घराबाहेर पडल्या होत्या; पण मैत्रिणींशी गप्पा करताना आणि वाण देण्याच्या नादात या सर्व गोष्टींचा महिलांना काही काळ नकळत विसर पडलेला दिसला.

इतर सणांच्या तुलनेत हा सण तरी मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करता आला, म्हणून महिलांनी समाधान व्यक्त केले आणि कोरोनाचे संकट नव्या वर्षात पूर्णपणे टळू दे, अशी मनोकामना करत सण साजरा केला.

Web Title: Fear of Harley Corona in the face of Sankranti excitement