औरंगाबादमध्ये दोन मुलांना मारून पित्याची आत्महत्या
By Admin | Updated: January 5, 2015 13:35 IST2015-01-05T13:28:48+5:302015-01-05T13:35:37+5:30
टच्या दोन मुलांची हत्या करून पित्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे.

औरंगाबादमध्ये दोन मुलांना मारून पित्याची आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. ५ - पोटच्या दोन मुलांची हत्या करून पित्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे. औरंगाबादमधील चिखलठाणा परिसरात हा दुर्दैवी प्रकार घडल्याचे उघडकीस आले असून परिसरात मोठी खळबळ माजली आहे. चौधरी कॉलनीत राहणा-या या इसमाने आपल्या दोन्ही मुलांची गळा दाबून हत्या केली व त्यानंतर स्वत:ची नस कापून घेत आत्महत्या केली. त्या इसमाच्या या कृत्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरीह कौटुंबिक वादातूनतच हा प्रकार घडल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.