शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

चोरी प्रकरणी मुलाला अटक होताच पित्याने सोडला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 13:18 IST

दुचाकी चोरीप्रकरणी पोलिसांनी कारवाई करताच पित्यास हृदयविकाराचा झटका आल्याची घटना पैठण तालुक्यातील तारु पिंपळगाव येथे घडली 

जायकवाडी ( औरंगाबाद ) : दुचाकी चोरीप्रकरणात मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने वडिलांनी मोठा धसका घेतला. त्यातच हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. ही घटना पैठण तालुक्यातील तारु पिंपळगाव येथे मंगळवारी मध्यरात्री घडली. शब्बीर शेख (६३) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे बिडकीनसह तारु पिंपळगावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (दि.६) सकाळी गस्तीदरम्यान एक संशयित दुचाकी पोलिसांच्या नजरेत पडली. चौकशीनंतर ती चोरीची असून, तिचा मालक अमजद शेख असून, तो एमआयडिसी पोलीस ठाण्यात होमगार्ड म्हणून कार्यरत आहे. तसेच तो बनावट नंबर प्लेट लावून ही दुचाकी चालवीत असल्याचेसुद्धा तपासात स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी अमजद शेखला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने ही दुचाकी दत्ता निंभोरे याच्याकडून घेतल्याचे सांगितले. 

पोलिसांनी दत्ता निंभोरे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने ही दुचाकी कारखाना परिसरातील गोरख जगधने याच्याकडून घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी नंतर गोरख जगधनेला अटक करून चौकशी केल्यानंतर ही दुचाकी चोरीची असून, तिच्यासह पाच पाण्यातील मोटारपंप हे तारु पिंपळगाव येथील बिलाल शब्बीर शेख याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. या घटनेतील मुख्य सूत्रधार स्पष्ट झाल्यानंतर पोलीस मंगळवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास बिलाल याच्या घरी धडकले. त्यांनी चोरीप्रकरणी बिलाल याला ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. 

या घटनेचा बिलालचे वडील शब्बीर शेख यांना मोठा धक्का बसला. त्यात हृदयविकाराचा झटका आला. कुटुंबीयांनी त्यांना बिडकीन येथील शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुचाकी चोरीप्रकरणी वरील चार आरोपींविरोधात पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गावात छावणीचे स्वरूपबिलालला अटक केल्यानंतर शब्बीर शेख यांचे निधन झाल्याची बातमी गावात आणि नातेवाईकांना कळताच बिडकीन शासकीय रुग्णालय आणि तारु पिंपळगावात मोठा जमाव जमला. पोलिसांनी रात्री अचानक कारवाई केल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याने, दोन्ही ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. यामुळे पोलिसांनी तारु पिंपळगावात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल नेहूळ यांनी तिन्ही पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी आणि दंगाकाबू पथक तैनात केले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादDeathमृत्यूPoliceपोलिस