पित्यानेच केला बलात्कार
By Admin | Updated: June 25, 2014 01:04 IST2014-06-25T01:00:20+5:302014-06-25T01:04:32+5:30
लातूर : एमआयडीसी भागातील एका जन्मदात्या ६० वर्षीय पित्याने आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर गेल्या चार वर्षांपासून सतत बलात्कार केला़ सोमवारी ही घटना उघडकीस आली़.

पित्यानेच केला बलात्कार
लातूर : एमआयडीसी भागातील एका जन्मदात्या ६० वर्षीय पित्याने आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर गेल्या चार वर्षांपासून सतत बलात्कार केला़ सोमवारी ही घटना उघडकीस आली़ असून, पीडीत १५ वर्षीय मुलीची तक्रार येताच एमआयडीसी पोलिसांनी बापाच्या मुसक्या बांधून मंगळवारी न्यायालयात हजर केले़ त्याला दोन दिवसाची पोलिस कोठडी आहे.
उमरगा तालुक्यातील मुळज येथील मुळचा रहिवासी असलेला सुधाकर हा सध्या लातूर शहरातील एमआयडीसी भागात राहतो. गेल्या सहा ते आठ वर्षांपासून त्याचे आणि त्याच्या पत्नीचे पटत नसल्याने तो विभक्त असून, आपल्या मुलांसोबत लातुरातच वास्तव्यास आहे. त्याने गेल्या चार वर्षांपासून आपल्या कोवळ्या मुलीवर सतत लैंगिक अत्याचार केला़
बलात्कार केल्याचे कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकीही त्याने मुलीला दिली, असे पिडीत मुलीने एमआयडीसी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
सततच्या या अन्यायाला कंटाळून सोमवारी पीडित मुलीने फिर्याद देताच एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंद करून सुधाकरच्या मुसक्या बांधल्या. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे़ (प्रतिनिधी)
सुधाकर याला दोन मुले आणि दोन मुली आहेत. एका मुलीचे लग्न झाले असून, एक मुलगा हॉटेलमध्ये कामाला आहे. तर लहान मुलगा हॉस्टेलमध्ये राहतो. लग्न न झालेली ही मुलगी घरी एकटीच असे. तिच्यावर या निर्दयी बापाने बलात्कार केल्याची फिर्याद आहे़