शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

भयंकर ! जेवताना कायम रडते म्हणून बापाने दीड वर्षांच्या मुलीचा जमीनीवर आपटून केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 13:20 IST

father killed his daughter : मुलीची आई अश्विनीने घटना ऐकून टाहो फोडला. यानंतर रागाच्या भरात तिने दिराच्या दोन वर्षीय रिया रावण भोसले या मुलीला घेऊन पलायन केले.

ठळक मुद्देविधिसंघर्षग्रस्ताने कोणाला काही कळू नये, म्हणून चिमुकलीचा मृतदेह जमिनीत पुरला.घरच्यांनी मुलीबद्दल त्या विधिसंघर्ष पित्याला विचारले असता त्याने काहीही माहिती दिली नाही.

गंगापूर : जेवताना कायम रडते म्हणून दीड वर्षीय सावत्र मुलीला विधिसंघर्षग्रस्त पित्याने जमीनीवर आपटून क्रुरपणे खून केला. ही धक्कादायक घटना बुधवारी (१९) रात्री भेंडाळा शिवारातील अंतापुरात घडली. यानंतर मयत मुलीच्या आईने रागाच्या भरात दिराच्या दोन वर्षीय चिमुकलीला घेऊन पोबारा केला. या घटनेमुळे गंगापूर तालुका हादरला आहे.

पहिल्या पतीपासून वेगळ्या राहणाऱ्या अश्विनी करण भोसले (२०) यांनी आपल्या दीड वर्षाच्या सवसंया या मुलीसह दोन महिन्यांपूर्वी अंतापुरात येथील १४ वर्षीय विधिसंघर्षग्रस्तासोबत विवाह केला होता. दीड वर्षाची सवसंया ही जेवताना नेहमी रडते म्हणून चीड आल्याने सावत्र बापाने बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सवसंयाला उचलून घराबाहेर नेऊन जोराने जमिनीवर आपटले. यात त्या कोवळ्या जीवाचा जागीच मृत्यू होऊन कायमस्वरुपी आवाज बंद झाला. यानंतर विधिसंघर्षग्रस्ताने कोणाला काही कळू नये, म्हणून चिमुकलीचा मृतदेह जमिनीत पुरला.

घरच्यांनी मुलीबद्दल त्या विधिसंघर्ष पित्याला विचारले असता त्याने काहीही माहिती दिली नाही. यावरुन त्याच्या आई-वडिलांनी त्यास कोंडून मारहाण करीत विचारपूस केली. त्यानंतर त्याने घडलेली घटना सांगितली. तेव्हा मयत मुलीची आई अश्विनीने घटना ऐकून टाहो फोडला. यानंतर रागाच्या भरात तिने दिराच्या दोन वर्षीय रिया रावण भोसले या मुलीला घेऊन पलायन केले. घडलेल्या या सर्व प्रकाराची माहिती विधीसंघर्षग्रस्ताच्या आईने गंगापूर पोलिसांना गुरुवारी दिली. पोलिसांनी सावत्र मुलीचा खून करणाऱ्या विधिसंघर्षग्रस्तास ताब्यात घेत पुरलेला मृतदेह बाहेर काढून घटनास्थळाचा पंचनामा केला व मुलीचे शवविच्छेदन केले. विधीसंघर्षग्रस्त पित्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक औटे, गुप्त वार्ता शाखेचे योगेश हरणे, स्वाती गायकवाड, निंबोरकर, शेख भिल्ल करीत आहेत.

निष्पाप रिया अडकलीनवऱ्याने आपल्या मुलीचा खून केल्याची घटना कानी आल्यावर तिची आई अश्विनीने आपल्या दिराच्या दोन वर्षीय रिया या मुलीला घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. यात त्या निष्पाप रियाचा काहीही दोष नसताना विनाकारण तिला धारेवर धरले गेले आहे. रियाचे आई-वडील, आजी-आजोबांचा जीव यामुळे कासावीस झाला असून, आमची मुलगी शोधून आणा, अशी आर्त विनवणी त्यांनी गंगापूर पोलिसांकडे केली आहे. रागाच्या भरात अश्विनी त्या चिमुकलीसोबत काही बरेवाईट करेल, असा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे तिचा कसून शोध सुरु आहे.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी