कन्नड ( छत्रपती संभाजीनगर) : पिशोर मार्गावरील कोळसवाडी खांडी येथे उसाने भरलेला ट्रक उलटून भीषण अपघात झाला. यात सहा मजुरांचा मृत्यू झाला असून ९ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी पहाटे एक वाजेच्या दरम्यान झाला.
पिशोर कन्नड मार्गावर कोळसवाडी खांडी येथे रविवारी मध्यरात्री १२: ३० वाजेच्या दरम्यान ट्रक (क्रमांक जी.जे. १०टि.व्ही.८३८६ ) चिंचोली वरून रसवंतीसाठी ऊस घेऊन गुजरात कडे निघाला होता. ट्रकमध्ये ऊस जास्त भरलेला होता. त्यात वेग जास्त असल्याने ट्रक कोळसवाडी खांडी येथे येताच अनियंत्रित होऊन रोड खाली उलटला. यात ट्रकच्या टपावर आणि केबिनमध्ये बसलेले ऊसतोड मजूर उसाच्या खाली दबले गेले. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य नऊ गंभीर जखमी झाले आहेत.
मृतांची नावे अशी:किसन धर्म राठोड (वय ३२), कृष्णा मूलचंद राठोड (वय३०) मिथुन मारू चव्हाण (वय२६) मनोज नामदेव चव्हाण (वय २३)विनोद नामदेव चव्हाण (वय२६)सर्व रा. सातकुंड ता.कन्नड तरज्ञानेश्वर देविदास चव्हाण (वय३०)रा.बेलखेड तांडा
जखमी मजुरांची नावे अशी:इंदलचं प्रेमचंद चव्हाण (वय ३१) लखन छगन राठोड ( वय२९) सचिन भागिनाथ राठोड (वय२२) राहुल नामदेव चव्हाण (वय१९) रवींद्र नामदेव राठोड( वय २५) सागर भागिनाथ राठोड (वय२५ ) राणीबाई लखन राठोड (वय३०) सर्व राहणार सात कुंड तर इस्माईल अब्दुल जेडा( वाहन चालाक ) उमर मुसा जेडा( क्लीनर )सर्व रा. गुजरात जखमी मजुरांवर चाळीसगाव, छत्रपती संभाजीनगर, कन्नड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.