शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

पाचोडमध्ये भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलवरील दोघे जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2024 21:19 IST

रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पाचोड पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली आहे. 

पाचोड- पाचोड ते पैठण रोडवर पाचोडपासून जवळ असलेल्या भुमरे पाटील पेट्रोल पंपासमोर अज्ञात वाहनाने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत मोटरसायकल वरील दोन जण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेसात वाजता घडली आहे. 

पाचोड पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार थेरगाव येथील छगन एकनाथराव भांगळ(वय ५८) रविवारच्या आठवडी बाजारासाठी पाचोडला आले होते. पाचोड येथील कामकाज आटोपून ते आपल्या मोटरसायकलवरुन गावाकडे जात असताना पाचोडला बस स्थानकासमोर  लिंबगाव येथील  सोसायटीचे चेअरमन गोरख भाऊराव हिंगले पाटील(वय ६०)  हे त्यांना भेटले.

मोटरसायकलचे पेट्रोल संपल्यामुळे गोरख  हिंगले हे छगन भांगळ यांच्या मोटरसायकलवर बसून पाचोड ते पैठण रोडवर असलेल्या भुमरे पाटील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात असताना पैठण कडून पाचोडकडे येणाऱ्या अज्ञात वाहनाने मोटरसायकलला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात मोटरसायकलवरील दोघांना डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे दोघेही घटनास्थळी जागीच ठार झाले.

या अपघाताची माहिती या रोडवरून जाणाऱ्या  ग्रामस्थांनी तातडीने पाचोड पोलीस स्टेशनला दिली. यावेळी पाचोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे पाटील, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब गव्हाणे यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन दोन्हीही मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदिपान काळे यांनी या दोघांना तपासून मयत घोषित केले. यानंतर पाचोड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पाचोड पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAccidentअपघातAurangabadऔरंगाबाद