लोकमत न्यूज नेटवर्कनित्रूड : पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी या परिसरात एक - दोन वेळा पाऊस झाला. त्या आधारावर खरिपाची पेरणी केली. पिके चांगली आली. मात्र, पावसाने मोठी ओढ दिल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. येत्या काही दिवसात पावसाने समाधानकारक हजेरी लावली नाही तर तोंडचा आलेला घास जाऊ शकतो अशी स्थिती आहे.जूनमध्ये सुरुवातीला पेरणीलायक पाऊस झाल्याने बी-बियाणांची तसेच खतांची खरेदी केली. काळ्याची आईची शेतकºयांनी ओटी भरली. जमिनीत ओल चांगली राहिल्याने पिके जोमात आली.मागील २० दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. त्यामुळे पेरलेले पीक वाया जाते की काय, अशी भीती शेतकºयांना वाटत आहे.कर्ज घेण्यास येत असलेल्या अडचणींमुळे खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन खत, बी-बियाणे खरेदी केले. आता जायचे तरी कोणाच्या दारात, अशा गंभीर प्रश्न शेतकºयांना भेडसावत आहे. पेरणीपूर्व अनुदानाची घोषणा हवेत विरली तर कर्जमाफीही संभ्रमात टाकणारी असल्याने शेतकरी चिंतातुर आहेत.
पावसाची ओढ; शेतकरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:44 IST