शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
2
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
3
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
4
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
5
आयकर विभागाचा मोठा छापा; हवाला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून २५ कोटींची रोकड, हिरे, सोनं जप्त
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
7
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
8
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
9
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
10
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
11
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
12
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
13
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
14
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
15
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
16
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
17
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
18
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
19
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
20
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 

दिलासादायक! पाचोड येथे जूनपासून शेतकऱ्यांना मिळणार मोसंबी हाताळणी केंद्राचा लाभ

By बापू सोळुंके | Published: May 02, 2024 7:38 PM

पैठण तालुक्यात आणि विशेषत: पाचोड परिसरात मोठ्या प्रमाणात मोसंबीची लागवड होते.

छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने मॅगनेट प्रकल्पांतर्गत राज्य कृषी पणन महासंघाने एशियन बँकेच्या सहकार्याने पाचोड येथे फळे व भाजीपाला हाताळणी सुविधा केंद्र उभारले आहे. पाचोड परिसरातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी जूनपासून हे केंद्र खुले होणार आहे.

पैठण तालुक्यात आणि विशेषत: पाचोड परिसरात मोठ्या प्रमाणात मोसंबीची लागवड होते. या पार्श्वभूमीवर मोसंबी निर्यात सुविधा केंद्र पाचोड येथे असावे, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. या मागणीची दखल घेत शासनामार्फत सुमारे दोन वर्षांपूर्वी पाचोड येथील उपबाजार समितीच्या आवारात दोन एकरवर फळे व भाजीपाला हाताळणी सुविधा केंद्र उभारण्याचा निर्णय पणन महामंडळाने घेतला.

एशियन डेव्हल्पमेंट बँक आणि राज्य शासनाच्या महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने (मॅगनेट) प्रकल्पांसाठी १३ कोटी २४ लाख ४० हजार रुपये निधी उपलब्ध केला होता. या प्रकल्पाचे काम पूर्णत्वाकडे असून, जूनपासून हे केंद्र शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती पणन महासंघाचे अरूण नागरे पाटील यांनी दिली.

कोणत्या सुविधा उपलब्ध : ग्रेडिंग सेंटर - मोसंबीची विगतवारी करण्यासाठी ग्रेडिंग लाइनवर प्रति तास १५ मेट्रिक टन क्षमता.प्री कुलिंग - शेतमालाचे तापमान करण्यासाठी ६ मेट्रिक टन प्रति बॅच सुविधा (सहा तास प्रति बॅच)कोल्ड स्टोअरेज - शेतमाल काही दिवस टिकवून ठेवण्यासाठी २५ मेट्रिक टनाचे ४ चेंबर एकूण क्षमता १०० मेट्रिक टन. पॅक हाऊस - शेतमालाचे ग्रेडिंग आणि पॅकिंग करण्यासाठी ८ हजार ८२३ चौरस फुटाचा हॉल.यंत्र सामग्री आणि अन्य आवश्यक सुविधा - ६० मेट्रिक टन क्षमतेचा भुईकाटा, कार्यालय, स्टोअर, संरक्षक भिंत असलेली आधुनिक सुविधा.

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद