शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
2
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
5
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
6
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
7
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
8
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
9
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
10
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
11
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
12
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
13
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
14
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
15
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
16
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
17
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
18
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
19
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना

‘त्या’ शेतकऱ्याच्या आत्महत्येची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 19:36 IST

तलाठ्याने जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावावर केल्यामुळे औरंगाबाद तालुक्यातील कृष्णापूरवाडी येथील शेतकरी भावसिंग सुंदर्डे यांनी नुकतीच आत्महत्या केली.

ठळक मुद्देकृष्णापूरवाडीचे प्रकरण  विधानसभा अध्यक्षांकडून कुटुंबाचे सांत्वन  

फुलंब्री (औरंगाबाद ) : तलाठ्याने जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावावर केल्यामुळे औरंगाबाद तालुक्यातील कृष्णापूरवाडी येथील शेतकरी भावसिंग सुंदर्डे यांनी नुकतीच आत्महत्या केली. यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंगळवारी या गावास भेट देऊन या प्रकरणाची संपूर्ण चौकशी आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात येईल, यात दोषी असणाऱ्या सर्वांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांनी मयत भावसिंग यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. 

दोन एकर तीन आर. जमीन निहालसिंग वाळूबा सुंदर्डे, खुशालसिंग वाळूबा सुंदर्डे, महासिंग वाळूबा सुंदर्डे व परमजीतसिंग धिल्लो यांनी तलाठी पुंजाबा बिरारे यांच्याशी संगनमत करुन परस्पर नावावर केल्याने २५ नोव्हेंबर रोजी भावसिंग सुंदर्डे यांनी जाळून घेऊन आत्महत्या केल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली.

वास्तविक यासंदर्भात शेतकरी भावसिंग सुंदर्डे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तलाठी बिरारे यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. पण कुणीही लक्ष न दिल्याने त्यांनी जीवनयात्रा संपविली. यानंतर प्रकरणी वरील चार जणांविरुद्ध फुलंब्री पोलिसात गुन्हा दखल करण्यात आला. माझ्या वडीलांच्या मृत्यूस तलाठी पुंजाबा बिरारे हाही जबाबदार असून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मयताच्या मुलाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती, परंतु अजून कारवाई न झाल्याने मयताचे कुटुंब चिंतेत आहे.

तलाठ्याविरुद्ध ‘एसीबी’ची केस सुरुया प्रकरणातील तलाठी पुंजाबा बिरारे हा शेंद्रा येथे कार्यरत असताना २०१५ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागितल्याचा गुन्हा दाखल केला होता, हे प्रकरण अजून बोर्डावर आलेले नाही, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. मंगळवारी सीआयडीच्या पथकाने कृष्णापूरवाडी येथे जाऊन मयत शेतकऱ्याच्या कुटुंबाचे जाबजबाब घेतले. समृद्धी महामार्गात जाणाऱ्या जमिनीचा मोबदला मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने तलाठ्यांकडून अशी गैर कामे होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने चौकशी करण्याच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसHaribhau Bagadeहरिभाऊ बागडे