शेतकऱ्याची आत्महत्या
By Admin | Updated: March 29, 2017 00:20 IST2017-03-29T00:18:02+5:302017-03-29T00:20:26+5:30
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध बु येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली

शेतकऱ्याची आत्महत्या
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध बु येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून आणि मुलीच्या लग्नाच्या विवंचनेत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. दिलीप शिवराम लोखंडे (५२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
लोखंडे यांनी विष प्राशन केल्याचे नातेवाईकांच्या लक्षात येताच नातेवाईकांनी तातडीने त्यांना अकोला येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा रविवारी मृत्यू झाला. या प्रकरणी पारध पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लोखंडे त्यांच्याकडे स्टेट बँक आॅफ हैदराबाद शाखेचे ६३ हजारांचे कर्ज असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. प्रयत्न करूनही बँकेचे कर्ज भरण्यास अडचणी येत असल्याने त्यांनी विषारी द्रव प्राशन केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.