शेतक ऱ्यांच्या डोळ्यात आजही पाणी
By Admin | Updated: July 24, 2014 00:14 IST2014-07-23T23:51:07+5:302014-07-24T00:14:39+5:30
तळणी : मंठा तालुक्यातील तळणीसह परिसरात २३ जुलै २०१३ रोजी सकाळी १0 ते रात्री ११ अशा तब्बल १३ तासांत ३७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.

शेतक ऱ्यांच्या डोळ्यात आजही पाणी
तळणी : मंठा तालुक्यातील तळणीसह परिसरात २३ जुलै २०१३ रोजी सकाळी १0 ते रात्री ११ अशा तब्बल १३ तासांत ३७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे नदी- नाल्यांना पूर आला होता. वर्ष उलटल्यानंतरही अतोनात नुकसान झालेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. तर काहींना तुटपुंजी मदत मिळाली.
नदी-नाल्यांच्या काठावरील शेतांमधून पूर गेल्याने जमिनीसह खरीप पिके वाहून गेली होती. तर अनेकांची घरे पडली होती. व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरल्याने मोठे नुक सान झाले होते. मंठा ते लोणार रोडवरील वडगाव (सं) येथील सरस्वती नदीला पूर आल्याने सायंकाळी ६ वाजेपासून तर रात्री ३ वाजेपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. एका रात्रीतून शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले होते. अतिवृष्टीला एक वर्ष पूर्ण झाले तरी शेतकऱ्यांचा डोळ््यांत आजही पाणी येत आहे.
मागील वर्षीही यावर्षीप्रमाणे तळणी मंडळात मोठा पाऊस न झाल्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. मात्र २३ जुलै रोजी मुसळधार पावसाने तळणीसह परिसरातील सर्वच तलाव ओव्हर फ्लो झाले होते. आईचा तलाव तुडुंब भरु न फु टण्याचा मार्गावर होता.
भीतीने ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. पाझर तलाव गट क्र .७२६ मधील तलाव क्र . १० रात्री फु टल्याने शेकडो हेक्टर जमिनीतून पूर गेल्याने जमिनी खरडून खरिपाची पिके वाहून गेली. तर शेतोपयोगी साहित्य, नेट-शेड, ठिबक संच, पाईप वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले होते. वडगाव (सं) येथील सरस्वती नदीला पूर आल्याने अर्ध्या गावात पाणी शिरले होते. ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवले होते. तर नदीला पूर आल्याने सायंकाळी ६ वाजेपासून लोणार व मंठ्याक डे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. रात्री ११ वाजता पाऊस थांबल्यामुळे ३ वाजता वाहतूक सुरळीत करण्यात आली होती. वाघाळा, देवढाणा, कोकंरबा या गावाक डे जाण्याऱ्या नाल्यांना पूर गेला. प्रथमच तळणी मंडळात ३७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. अनेक लोकप्रतिनिधींनी भेटी दिल्या. मदतीचे आश्वासन दिले. मात्र अनेकांना तुटपुंजी मदत मिळाली तर अद्यापही मदतीपासून वंचित आहेत. एका रात्रीतून शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले होते. एका वर्षानंतरही शेतकरी त्या अतिवृष्टीतून सावरलेला नाही. आठवण येताच डोळ्यात पाणी येत असल्याचे पूरग्रस्त शेतकरी मांगीलाल चव्हाण, शिवाजी गुजर, ज्ञानेश्वर सरक टे, लक्ष्मण राऊत, मीराबाई गत्ते, कैलास पवार यांनी सांगितले. (वार्ताहर)