शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेचे शटर केले बंद

By Admin | Updated: June 9, 2017 00:04 IST2017-06-09T00:02:01+5:302017-06-09T00:04:41+5:30

गंगाखेड : बँकेमध्ये दिवसभर थांबूनही पीक विमा किंवा कापूस अनुदानाची खात्यावर जमा असलेली रक्कम मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या शाखेचे शटर बंद केल्याची घटना घडली.

The farmers shut the shutters of the District Bank | शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेचे शटर केले बंद

शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेचे शटर केले बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड : बँकेमध्ये दिवसभर थांबूनही पीक विमा किंवा कापूस अनुदानाची खात्यावर जमा असलेली रक्कम मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी ८ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास येथील जिल्हा बँकेच्या शाखेचे शटर बंद केल्याची घटना घडली.
गंगाखेड शहरात जिल्हा बँकेची शाखा आहे. या शाखेमध्ये तालुकाभरातील विविध ठिकाणच्या शेतकऱ्यांचे बँक खाते आहे. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विमा, कापसाचे अनुदान आदी पैसे जमा आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांपासून खात्यावर जमा असलेली रक्कम खातेदार शेतकऱ्यांनाच मिळत नसल्याचा प्रकार घडत आहे. पैसे काढण्यासाठी दलालामार्फत स्लीप भरुन दिल्यास सायंकाळी पैसे मिळत असल्याची तक्रार गेल्या काही दिवसांपासून शेतकरी करीत आहेत. दिवसभर बँकेत थांबूनही पैसे मिळत नसल्याने संतप्त झालेल्या काही शेतकऱ्यांनी ८ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास याबाबतचा जाब बँकेतील अधिकाऱ्यांना विचारला. समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने या शेतकऱ्यांनी बँकेचे शटर बंद करुन तहसील कार्यालय गाठले. तहसीलदार संजय पवार यांची भेट घेऊन त्यांनी आपले गाऱ्हाणे मांडले. तहसीलदार पवार यांनी बँकेतील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी परभणीहून रक्कम मागविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शटर उघडण्यात आले. तोपर्यंत बँकेच्या आतमध्ये कर्मचारी काम करीत बसले होते. ३.३० वाजेच्या सुमारास परभणीहून ५ लाखांची कॅश आली. त्यानंतर संबंधित खातेदारांना त्यांच्या विड्रॉल स्लीपप्रमाणे रक्कम देण्यात आली.

Web Title: The farmers shut the shutters of the District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.