शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
14
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
15
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
16
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
17
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
18
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
19
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
20
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई

शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 11:49 PM

यंदाचीही परिस्थिती बिकट असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे ‘शेतकरी हा कर्ज मुक्त झालाच पाहिजे’ आदी घोषणा करत आ. रामराव वडकुते यांच्या नेतृत्वाखाली १६ आॅगस्ट रोजी शेतकºयांनी सेनगाव तहसीलवर मोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : यंदाचीही परिस्थिती बिकट असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे ‘शेतकरी हा कर्ज मुक्त झालाच पाहिजे’ आदी घोषणा करत आ. रामराव वडकुते यांच्या नेतृत्वाखाली १६ आॅगस्ट रोजी शेतकºयांनी सेनगाव तहसीलवर मोर्चा काढला.यंदाही सेनगाव तालुक्यात सरासरीच्या अंत्यत कमी पाऊस झाल्याने पिके संकटात सापडली आहेत. त्यामुळे सेनगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकºयांना तातडीने नवीन पीक कर्ज वाटप करावे, वन्य प्राण्यांपासून शेतकºयांचे संरक्षण करावे, वनविभागामार्फत केल्या जात असलेल्या कामाची चौकशी करावी. तसेच सेनगाव येथे मंजूर वनपरीक्षेत्र कार्यालय तात्काळ कार्यान्वित करावे, आदी मागण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते, शेतकºयांचा आ. रामराव वडकुते यांच्या नेतृत्वाखाली आजेगाव कॉनरवरून मोर्चा काढला. मुख्य रस्त्यावरून मोर्चा दुपारी दोन वाजता तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चात शेतकºयांना मार्गदर्शन केले. राज्य व केंद्र शासनाच्या धोरणाबद्दल टिका केली. तहसीलदार वैशाली पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. प्रशासनाने मागण्या संदर्भात सकारात्मक कारवाईच केली नाही तर यापुढेही तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा आ. वडकुते यांनी दिला. मोर्चात आ. वडकुते यांच्यासह किसान विकास मंचचे माजी आ. शंकर अण्णा धोंडगे, रा.कॉ जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, जि.प. उपाध्यक्ष अनिल पतंगे, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, औंढा तालुकाध्यक्ष संजय दराडे, माजी सभापती अप्पासाहेब देशमुख, शिवसेना जिल्हा उपप्रमुख संदेश देशमुख, माजी जि.प. सदस्य विनायकराव देशमुख, रा.का तालुकाध्यक्ष रवींद्र गडदे, जि.प. सदस्य संजय कावरखे, उपनगराध्यक्ष कैलास देशमुख, नगरसेवक उमेश देशमुख, विकास शिंदे, सचिन देशमुख, संदीप बहिरे, निखील देशमुख, दत्तराव टाले, नितीन गोरे, गजानन पाटील, अरुणआप्पा खुळे, शालीक गडदे, प्रवीण महाजन, संतोष तिडके, देविदास, अनंता देशमुख, विनोद आकमार आदी सहभागी होते.