शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

२५ मेपासून सुरू होणार शेतकऱ्यांची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:54 PM

पेरणीपूर्व ते पीक काढणीपर्यंतची तंत्रशुद्ध पद्धती, नवतंत्रज्ञान याची इत्यंभूत माहिती देण्यासाठी २५ मेपासून शेतकऱ्यांची शाळा सुरू होणार आहे. विभागातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत मिळून २६५२ कृषिशाळा घेण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देकृषी विभाग : औरंगाबाद विभागात २६५२ कृषिशाळेचे नियोजन

औरंगाबाद : पेरणीपूर्व ते पीक काढणीपर्यंतची तंत्रशुद्ध पद्धती, नवतंत्रज्ञान याची इत्यंभूत माहिती देण्यासाठी २५ मेपासून शेतकऱ्यांची शाळा सुरू होणार आहे. विभागातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत मिळून २६५२ कृषिशाळा घेण्यात येणार आहेत.कृषिशाळा घेण्याची जबाबदारी कृषी विभाग, नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व आत्मा या तीन यंत्रणांवर टाकण्यात आली आहे. ९० टक्के शेतकरी असे आहेत की, ते पारंपरिक पद्धतीने शेती करतात. त्यांनी अत्याधुनिक शिक्षण घेतलेले नाही. शेतीक्षेत्रातील नवनवीन शोधाची माहिती शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषिशाळा घेण्याचा निर्णय कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी खरीपपूर्व हंगाम बैठकीत जाहीर केला होता. कृषिशाळेमध्ये पेरणीपूर्व, पीक पेरणी, पीक वाढीची अवस्था, काढणी व काढणी पश्चात असे टप्पे ठरविण्यात आले आहेत. शेतकºयांना सक्षम करण्यासाठी कृषिशाळेच्या माध्यमातून नवे तंत्रज्ञान थेट बांधावर पोहोचविले जाणार आहे. या प्रक्रियेत विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि कंपन्यांच्या तज्ज्ञ अभ्यासकांची मदत घेतली जाणार आहे. प्रत्येक कृषी सहायक व कृषी पर्यवेक्षकांमार्फत प्रत्येकी एका गावात कृषिशाळा घ्यावी, असे आदेश आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात ४०३ कर्मचारी ६२६ गावांत ८६९ कृषिशाळा घेणार आहेत. जालना जिल्ह्यात ३५४ कर्मचारी ५७९ गावांत ८२३ कृषिशाळा, तर बीड जिल्ह्यात ४२४ कर्मचारी ६८४ गावांत ९६० कृषिशाळा घेणार आहेत. विभागात एकूण ११८१ कर्मचारी १८८९ गावांत २६५२ कृषिशाळा घेणार आहेत. २५ मेपासून कृषिशाळेला सुरुवात होईल.प्रत्यक्ष शेतावरच प्रात्यक्षिकासह शेतकºयांना माहिती देण्यात येणार आहे. कृषी विभागातर्फे कापूस पिकावरील ६३५, सोयाबीन १६२, मका ११३, तूर १०४, तर उसावरील २८ शेतीशाळा घेणार आहेत. याशिवाय नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाद्वारे १५२६, तर आत्माद्वारे ८४ कृषिशाळा घेण्यात येतील.अळीच्या प्रादुर्भावाची स्थिती लगेच कळेलयंदा मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची भीती कृषी विभागाने व्यक्त केली आहे. कृषी अधिकारी, कर्मचारी व शेतकरी कृषिशाळेच्या निमित्ताने दिवसभर शेतावर असणार आहेत. पेरणीनंतर पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाला, तर लगेच त्याची माहिती कृषी आयुक्त, कृषी विद्यापीठ यांना कळविण्यात येणार आहे. त्यासाठी खास अ‍ॅपही तयार करण्यात आले आहे. यावर काय उपाययोजना करायची, ते शास्त्रज्ञ लगेच सांगणार आहेत. यामुळे पिकांवरील अळीला वेळीच रोखण्यास मदत होऊ शकते.चौकट१७ वर्षांनंतर भरणार कृषिशाळाखरीप हंगामापूर्वी कृषिशाळा भरविण्याची कृषी विभागाची ही पहिलीच वेळ नव्हे. यापूर्वी २००३ मध्ये कृषी विभागाचे तत्कालीन आयुक्त सुधीरकुमार गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात कृषिशाळा भरविण्यात आला होत्या. हा प्रयोग यशस्वी झाला होता. त्यानंतर तब्बल १७ वर्षांनंतर कृषिशाळा भरविण्यात येत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी