चुकीच्या इतिवृत्तावर शेतकऱ्यांचा आक्षेप
By Admin | Updated: August 10, 2014 02:02 IST2014-08-10T01:57:59+5:302014-08-10T02:02:05+5:30
चुकीच्या इतिवृत्तावर शेतकऱ्यांचा आक्षेप

चुकीच्या इतिवृत्तावर शेतकऱ्यांचा आक्षेप
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगर प्रकल्प-४ विकसित करण्यासाठी मुंबईत झालेल्या बैठकीतील चुकीच्या इतिवृत्तावर शेतकऱ्यांनी आक्षेप घेऊन विरोध दर्शविला आहे. प्रशासन शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप कृती समितीच्या वतीने करण्यात आला आहे.
सिडको वाळूज महानगर-४ प्रकल्प विकसित करण्यासाठी गोलवाडी- वळदगाव शिवारातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याचा निर्णय घेतला आहे. संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीला बाजारभावाप्रमाणे मावेजा देण्यात यावा, यासाठी या शेतकरी कृती समिती व सिडको प्रशासनात वाद सुरू आहे. यासंदर्भात समाधानकारक तोडगा काढण्यासाठी १० जूनला मुंबईत विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या दालनात कृती समितीचे पदाधिकारी व सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला विधानसभा अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील, आ. प्रकाश सोळंके, नगरविकास खात्याचे प्रधान सचिव मनूकुमार श्रीवास्तव, महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर, अतिरिक्तमुख्य नियोजनकार गणेश डेंगळे, कक्ष अधिकारी विनायक चव्हाण, सहयोगी नियोजनकार निर्मलकुमार गोलखंडे, सिडको वाळूज महानगर कृती समितीचे अध्यक्ष रंगनाथ काळे, विष्णू सलामपुरे व शेतकऱ्यांची उपस्थिती होती. या बैठकीत संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मावेजा कमी असल्यामुळे नवीन भूसंपादन कायद्यानुसार मावेजा देण्यासाठी सिडकोकडून शासनाकडे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.