शेतकरी संघटनांचा नवा राजकीय पक्ष - रघुनाथ पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:03 IST2017-12-16T00:03:22+5:302017-12-16T00:03:51+5:30
प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय निर्माण करण्यासाठी देशभरातील शेतकरी संघटना एकत्र येऊन नवा राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.

शेतकरी संघटनांचा नवा राजकीय पक्ष - रघुनाथ पाटील
औरंगाबाद : प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय निर्माण करण्यासाठी देशभरातील शेतकरी संघटना एकत्र येऊन नवा राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.
काँग्रेसने शेतीमालाला भाव दिला नाही म्हणून भाजपाला निवडून आणले; मात्र सत्तेत आल्यावर त्यांनी स्वामीनाथन आयोग लागू करता येणार नाही, असे शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले. सरकारचे धोरण शेतक-यांचे मरण असेल, तर या प्रस्थापितांच्या विरोधात नवीन पर्याय निर्माण करण्याशिवाय आमच्यासमोर गत्यंतर नाही. देशभरातील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन शेतकºयांचा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही देशभरात उमेदवार उभे करणार आहोत, असे पाटील यांनी सांगितले.
अजून नवीन पक्षाचे नाव निश्चित केले नाही. पुढील आठवड्यात अलाहाबाद येथे देशभरातील शेतकरी संघटनांची बैठक आहे. तीत राजकीय पक्षाच्या नावासंदर्भात चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शरद जोशी ते राजू शेट्टी
शेतकरी नेत्यांनी राजकीय पक्ष काढण्याचा प्रयोग यापूर्वीही झालेला आहे. शेतकºयांचे नेते शरद जोशी यांनी ‘स्वतंत्र भारत पक्ष’ स्थापन करून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले होते. ते स्वत:ही नांदेडमधून निवडणूक लढले. मात्र पराभूत झाले. त्यानंतर राजू श्ोट्टी यांनी ‘स्वाभिमानी शेतकरी संघटना’ स्थापन करून लोकसभेची निवडणूक लढविली आणि दुसºयांदा ते विजयी झाले.