शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपातळी खालावल्याने शेतकरी संकटात; पैठणमधील ८ हजार हेक्टरवरील फळबागा धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 18:08 IST

पैठण तालुक्यातील मुरमा येथील एका शेतकऱ्याने पाण्याअभावी मोसंबीची बाग जेसीबीच्या सहाय्याने मोडून काढली.

- अनिलकुमार मेहेत्रेपैठण : तालुक्यात पाण्याअभावी ८ हजार हेक्टर क्षेत्रावरील फळबागा धोक्यात आल्या असून, अनेक बोअर, विहिरींना पाणी नसल्याने शेतकरी मोसंबीच्या बागा मोडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पैठण तालुक्यात शेतकऱ्यांनी जवळपास ८ हजार हेक्टर क्षेत्रावर फळबागांची लागवड केली आहे. यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी मोसंबीची लागवड केली असून, अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबाचीही लागवड केली आहे. तालुक्यातील जमीन सुपीक असल्याने व पाण्याची उपलब्धताही चांगली असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील शेतकरी फळबागांची लागवड करतात. त्यामुळे पैठणला मोसंबीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पैठणची मोसंबी सातासमुद्रापार गेली आहे. याच मोसंबीच्या बागा आता धोक्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने जमिनीतील पाणी पातळी कमालीची खालावली आहे. त्यामुळे बोअर, विहिरींची पाणी पातळी खोलवर गेली आहे. त्यामुळे या बागांचा सांभाळ करणे शेतकऱ्यांना कठीण जात आहे.

परिणामी चार वर्षे काळजीपूर्वक जपणूक केलेली मोसंबीची झाडे आता जड अंतकरणाने तोडावी लागत आहेत. मुरमा गावातील शेतकरी राजेंद्र लेंभे यांच्याकडे जेमतेम शेती आहे. त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये मोसंबीची ३०० झाडे लावली होती. आता त्यांच्या विहिरीचे पाणी आटल्याने त्यांनी शनिवारी मोसंबीची बाग जेसीबीच्या सहाय्याने तोडली. शेतकरी लेंभे यांच्यासारखेच अनेक शेतकरी सध्या आपल्या शेतातील फळबागा तोडत आहेत.

पाणी नसेल तर फळे नको पैठण तालुक्यात साडेसात ते आठ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी फळबागांची लागवड केली आहे. सध्या तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, याचा फटका फळबागांना बसत आहे. शेतात पाण्याची व्यवस्था नसेल तर शेतकऱ्यांनी मोसंबीच्या झाडावर कुठल्याही प्रकारची फळे ठेवू नयेत.-संदीप शिरसाठ, तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रWaterपाणी