पीकविम्याच्या पैशासाठी शेतकऱ्यांचे भजन व भोजन आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 23:57 IST2019-06-10T23:57:16+5:302019-06-10T23:57:32+5:30
पदरमोड करून पीकविमा भरला खरा; पण शेतकऱ्यांच्या खात्यावर एक ढेला आला नाही. मग आमचे पैसे गेले कुठे? फसवी योजना कुणासाठी? असे म्हणून शेतकºयांनी टाळ मृदंगावर ‘जय जय राम कृष्ण हरी’चा गजर कृषी अधीक्षक कार्यालयात सोमवारी केला.

पीकविम्याच्या पैशासाठी शेतकऱ्यांचे भजन व भोजन आंदोलन
औरंगाबाद : पदरमोड करून पीकविमा भरला खरा; पण शेतकऱ्यांच्या खात्यावर एक ढेला आला नाही. मग आमचे पैसे गेले कुठे? फसवी योजना कुणासाठी? असे म्हणून शेतकºयांनी टाळ मृदंगावर ‘जय जय राम कृष्ण हरी’चा गजर कृषी अधीक्षक कार्यालयात सोमवारी केला.
शेतकºयांना पीक विमाच देणार असाल, तर त्यांच्याकडून वसुली कशाला करता, कोट्यवधींचा विमा जमा करून नुकसान होऊनही शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसणाºया कंपनी व शासकीय यंत्रणेच्या अधिकाºयांवरही कारवाई करण्याची गरज आहे. जिल्ह्यात २ लाख २० हजार शेतकरी विम्यापासून वंचित राहिले आहेत. ज्यांना विमा मंजूर झाला आहे, त्यांच्या खात्यात पैसे का आले नाही, तांत्रिक बाबींचा खुलासा अधिकाºयांनी करावा, खाजगी कंपनीला पाठीशी घालून चालणार नाही. फळ पीकविमादेखील शेतकºयांना द्यावा. दि. १५ जूनपर्यंत शेतकºयांच्या खात्यात विम्याचे पैसे आले नाही, तर कायगाव टोका येथे सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी शेतकºयांनी दिला.
टाळ मृदंगावर भजन
अण्णासाहेब जाधव (मनसे), अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजी सूर्यवंशी, शेतकरी कामगार पक्षाचे महेश गुजर, जनक्रांती सेनेचे अजय साळुंके, कृष्णा शेलार, धनसिंग राजपूत, डॉ. त्यागी, भास्कर झिरपे, भाऊसाहेब गायके, विक्रम चव्हाण आदींसह शेकडो शेतकºयांनी सहभाग नोंदवून भजन व भोजन आंदोलन केले. शेवटी कृषी अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले.