शेतकरी धान्य योजनेला ग्रहण!
By Admin | Updated: February 28, 2017 00:47 IST2017-02-28T00:46:34+5:302017-02-28T00:47:10+5:30
लातूर : फेब्रुवारी महिन्याचे नियतन अद्याप आले नसल्याने जिल्ह्यातील पावणे चार लाख लाभार्थी शेतकऱ्यांना गहू, तांदळाची प्रतीक्षा आहे.

शेतकरी धान्य योजनेला ग्रहण!
लातूर : दुष्काळामुळे शेतकऱ्यांसाठी एपीएल धान्य वाटप योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र फेब्रुवारी महिन्याचे नियतन अद्याप आले नसल्याने जिल्ह्यातील पावणे चार लाख लाभार्थी शेतकऱ्यांना गहू, तांदळाची प्रतीक्षा आहे. २०१६ च्या डिसेंबर महिन्यात धान्य कोटा आला होता. त्यानंतर कोटा आला नसल्याने योजना बंद पडली की काय, अशी भीती लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने स्वस्त धान्य योजना शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आली असून, लातूर जिल्ह्यात ३ लाख ७० हजार ९९४ लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. प्रती व्यक्ती ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ अल्प दरात देण्याची ही योजना आहे. तांदूळ ३ रुपये किलो, तर गहू २ रुपये किलो दराने या लाभार्थ्यांना दिला जातो. त्यासाठी २०१६ च्या डिसेंबर महिन्यात जानेवारीपर्यंतचा कोटा आला होता. गहू १११२.७ मेट्रिक टन तर तांदूळ १७४१.७ मेट्रिक टन आला. त्याचे वाटपही करण्यात आले. मात्र जानेवारीनंतर नियतन कोटा आला नाही.
गहू व तांदळाच्या खरेदीचे दर वाढले आहेत. गव्हाचे प्रती टन ८१९० रुपयांनी तर तांदळाचे ३२ हजार ६६७ रुपयांनी दर वाढले आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने ही योजना असल्याने आणि नव्या खरेदीत दर वाढल्यामुळे विलंब होत असल्याचे पुरवठा विभागातून सांगण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने ही योजना सुरू आहे. परंतु, दरवाढीमुळे लाभार्थ्यांना गहू, तांदळाची प्रतीक्षा करावी लागत आहे. डिसेंबरनंतर नियतन कोटा मंजूर झाला नव्हता. परंतु, आता १११२.७ मेट्रिक टन गहू आणि ७७१.७ मेट्रिक टन तांदूळ मंजूर झाला आहे. फेब्रुवारी व मार्च या दोन्ही महिन्यांचा नियतन कोटा राज्य शासनाकडून मंजूर झाला