शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला व फळविक्री केंद्र सुरू

By admin | Updated: November 28, 2014 01:16 IST

औरंगाबाद : आदिनाथनगर वसाहत (गारखेडा परिसर) या ठिकाणी तालुका कृषी कार्यालयामार्फत शेतकरी मंडळाकडून भाजीपाला व फळविक्री केंद्र उभारून शेतकऱ्यांचा

औरंगाबाद : आदिनाथनगर वसाहत (गारखेडा परिसर) या ठिकाणी तालुका कृषी कार्यालयामार्फत शेतकरी मंडळाकडून भाजीपाला व फळविक्री केंद्र उभारून शेतकऱ्यांचा भाजीपाला थेट शहरी ग्राहकांपर्यंत जावा, असा संकल्प असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक पंडित लोणारे म्हणाले. केंद्राचे उद्घाटन भाजीपाला पुरवठा प्रकल्पाचे राज्य सल्लागार भगवान कापसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी अधिकारी भोसले, कृषी विकास अधिकारी कोलते, आत्माचे उपसंचालक शिरडकर, तहसीलदार विजय राऊत यांची उपस्थिती होती. या प्रकल्पांतर्गत शेतकरी मंडळाने पिकविलेला ताजा भाजीपाला व फळे वेगवेगळ्या वसाहतींमध्ये जाऊन विक्री करण्यापेक्षा एकाच ठिकाणी सेंटरवर विक्रीसाठी उपलब्ध ठेवला जाणार आहे. त्यामुळे शेतकरी-ग्राहक असाच व्यवसाय वाढीस लागेल. त्यामुळे दलाल नाहीसे होऊन शेतकऱ्यांना योग्य भाव हाती अन् ग्राहकांना ताजा भाजीपाला मिळावा हाच कृषी विभागाचा उद्देश आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पिकविलेला भाजीपाला व फळे मिळणार आहेत. शेतकऱ्यांकडून ताजा भाजीपाला थेट मिळणार असल्याने तो स्वस्त दरात व चांगल्या दर्जाचा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.४जय बाबाजी मंडळ, पळशी, हरसिद्धी माता शेतकरी मंडळ, ओहर यांनी पुढाकार घेतला असून, शहरातील नागरिकांना ताजा भाजीपाला दररोज उपलब्ध करून देण्यासाठी शेतकरी व अधिकारी प्रयत्न करीत आहेत. मॉल्सच्या बाजूलाच हा उपक्रम राबवून शेतकऱ्यांना वेगळे मार्केट निर्माण करून दिल्याने शेतकरीही उत्साहाने तयार झाले आहेत. ४नागरी वसाहतीमध्ये शेतकरी ते ग्राहक थेट फळे व भाजीपाला पुरवठा प्रकल्प सुरू करावयचा असेल त्यांनी तालुका कृषी अधिकारी अशोक कोंडे, ‘आत्मा’च्या जाधव यांच्याशी संपर्क साधावा, असे कृषी सहायक शिवानंद आडे यांनी सांगितले.