शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयकृत बँकेतही शेतकऱ्याची अवहेलनाच

By admin | Updated: December 13, 2014 23:35 IST

पाटोदा: सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र अर्थार्जन मिळावे या करीता शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला होता

पाटोदा: सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र अर्थार्जन मिळावे या करीता शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला होता. राष्ट्रीयकृत बँकांकडून पीक विमा स्वीकारला जात नसल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. बँकेच्या आडमुठेपणाला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.दुष्काळी स्थितीमध्ये धास्तावलेल्या शेतकऱ्यांना एका बाजूस मदत दिली जाणार असल्याच्या घोषणांचा पाऊस पडत आहे. मात्र प्रत्यक्षात ही मदत केंव्हा मिळेल याबाबत साशंकता आहे. गतवर्षी पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकांचा मोठ्या प्रमाणावर विमा उतरविला होता. त्यामधून नुकसान झालेल्या पिकांची रक्कम मिळणार असल्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी बाळगली होती. त्याचा बँकांनाही बऱ्यापैकी फायदा झाल्याचेही दिसून आले. तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे १ कोटी रुपये एवढा निधी मिळाला. यंदाच्या खरीपाच्या पिकांसाठी शेतकऱ्यांनी मोठी जोखीम स्वीकारली. पीक विम्याच्या किचकट नियमावलीबाबत साशंकता असतानाही जवळपास १ कोटी रुपये हप्त्यापोटी बँकेत भरणा केले आहेत. कृषी विभागाने रब्बी हंगामातील शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरावा म्हणून आवाहन केले होते. तर दुष्काळामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात असल्याने अनेक शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला आहे. अजूनही ३१ डिसेंबर पर्यंत पीक विमा उतरविला जाणार आहे. पीक विमा कुठल्याही बँकेत जमा करता येतो. मात्र शेतकऱ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेतच खाते असल्याने या बँकेकडेच ओढा वाढला आहे. येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत पीक विमा भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना विमा स्वीकारला जात नसल्याचे सांगण्यात येत आहे.त्यामुळे अगोदरच दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या शेतकऱ्यांची राष्ट्रीयकृत बँकेकडूनही अवहेलना होत आहे. अनेक वेळा खेटे मारूनही पीक विम्याबाबतचे काम पूर्ण केले जात नाही. विम्याबाबतच्या किचकट प्रक्रियेची शेतकऱ्यांकडून पुर्तता केली जात आहे. मात्र येथील कर्मचाऱ्यांकडून त्याला योग्य असा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी पीक विमा योजनेपासून दुरावलेले आहेत. ३१ डिसेंबर ही पिक विम्यासाठी शेवटची तारीख असल्याने बँक परिसरात शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. मात्र येथील कर्मचाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे शेतकऱ्यांना निराशेनेच परतीचा मार्ग धरावा लागत आहे. (वार्ताहर)राष्ट्रीयकृत बँकेतील कर्मचारी, अधिकारी हे शेतकऱ्यांना तुच्छ वागणूक देत आहेत. तर धनदांडग्यांना कर्ज पुरवठा करत आहेत. हा दुजाभाव शेतकरी आणि इतरांमध्ये केला जात आहे. कर्जमंजुरी असूनही राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज वितरित केले जात नाही. - राजाभाऊ देशमुख, सामाजिक कार्यकर्तेपीक विमा उतरविण्यासाठी शेतकऱ्यांच्या हाती पंधरवाडा राहिलेला आहे. पीक विमा उतरवावा याकरीता विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना गळ घातली आहे. विमा उतरविल्यानंतर पुन्हा त्याची पुर्तता होत नसल्याचे यापूर्वी अनेक वेळा निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरविली होती. पीक विमा काढण्याचा कालावधी संपत आला असताना बँकेचे व्यवस्थापक पीक विमा स्वीकारण्याबाबत वरिष्ठांकडून आदेश नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.