पावणेदोन लाखांवर शेतकऱ्यांनी भरला पीक विमा

By Admin | Updated: August 7, 2014 02:06 IST2014-08-06T00:59:41+5:302014-08-07T02:06:48+5:30

उस्मानाबाद : जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊन पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे

Farmer's Crop Insurance on Pavanodon Lakhs | पावणेदोन लाखांवर शेतकऱ्यांनी भरला पीक विमा

पावणेदोन लाखांवर शेतकऱ्यांनी भरला पीक विमा

उस्मानाबाद : जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊन पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पीक विमा भरण्यासाठी अग्रही असल्याचे दिसूृन येत आहे. शेतकऱ्यांनी सर्वाधिक पिक विमा हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १०१ शाखेत जिल्ह्यातील १ लाख ८६ हजार २८ शेतकऱ्यांनी १३ कोटीवर खरीपाचा पिक विमा भरला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात गतवर्षीही दुष्काळजन्य परिस्थिती होती. यंदा ही अत्यल्प पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली होती. आजघडीला जिल्हातील ८९ टक्के पेरणी उरकली आहे. आणखी ४० हजार हेक्टवरील पेरणी होणे बाकी आहे. कृषी विभागाने खरीप पेरणीसाठी ३ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. वेळेवर पेरणी उरकेल, अशी अपेक्षा असतानाच पावसाने ओढ दिली. अख्खा जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या सुरूवातीला सलगत तीन-चार दिवस संततधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी चाढ्यावर मुठ धरली. आजघडील ३ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरणी झाली आहे. ४० हजार हेक्टर क्षेत्र पेरणी अद्याप ही झालेली नाही.
उस्मानाबाद तालुक्यातुन ३८ हजार ५६० शेतकऱ्यांनी २ कोटी ९३ लाख ९५ हजार रुपयांचा खरीपाचा पिक विमा भरला आहे. उमरगा तालुक्यातील ३३ हजार ३१८ शेतकऱ्यांनी २ कोटी ६१ लाख ६५ हजार रुपये, तुळजापूर तालुक्यातून २५ हजार ७२६ शेतकऱ्यांनी १ कोटी ८९ लाख ६१ हजार भरले, लोहारा तालुक्यातून १० हजार ३६९ शेतकऱ्यांनी ९२ लाख ९४ रुपयांचा पिक विमा भरला, कळंब तालुक्यातून २५ हजार ४८८ शेतकऱ्यांनी २ कोटी ८ लाख ४७ हजार रुपये भरले, भूम तालुक्यातून १८ हजार ८१० शेतकऱ्यांनी १ कोटी ३७ लाख ३९ हजार, वाशी तालुक्यातून ११ हजार ६१० शेतकऱ्यांनी १ कोटी ५ लाख ४७ हजार तर परंडा तालुक्यातून २२ हजार १४७ शेतकऱ्यांनी ९३ लाख २६ हजार रुपयांचा पिका विमा भरला असे जिल्ह्यातून १ लाख ८६ हजार २८ शेतकऱ्यांनी १३ ५० लाखावर पिक विमा जिल्हामध्यवर्तीच्या १०१ शाखेत भरला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Farmer's Crop Insurance on Pavanodon Lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.