भावकीच्या जुन्या वादातून शेतकर्‍याचा खून

By Admin | Updated: May 14, 2014 00:41 IST2014-05-14T00:34:50+5:302014-05-14T00:41:13+5:30

जालना : तालुक्यातील अहंकार देऊळगाव येथे भावकीच्या जुन्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात अंकुश भिकाजी चिडे यांच्यावर कुºहाड व विळ्याने हल्ला करण्यात आला.

Farmer's blood from old fiance | भावकीच्या जुन्या वादातून शेतकर्‍याचा खून

भावकीच्या जुन्या वादातून शेतकर्‍याचा खून

जालना : तालुक्यातील अहंकार देऊळगाव येथे भावकीच्या जुन्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात अंकुश भिकाजी चिडे यांच्यावर कुºहाड व विळ्याने हल्ला करण्यात आला. घाटी दवाखान्यात घेऊन जातांना करमाड येथे ते मरण पावले. ही घटना १२ मे २०१४ रोजी रात्री ९.३० वाजता घडली. अहंकार देऊळगाव येथे चिडे कुटुंबांची शेती आहे. सर्वांची शेती लगत असल्यामुळे सर्वांनाच एक - दुसर्‍याच्या शेतातून जावे लागते. काही जणांनी रस्ता अडवून वाद निर्माण केला होता. हे प्रकरण प्रचंड विकोपाला गेले. ३ मार्च रोजी चिडे कुटुंबियांच्या दोन गटात किरकोळ हाणामारी झाली. दोन्ही गटांनी एकमेकां विरोधात तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. दोन्ही गटांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. त्यामुळे काही दिवस वाद थांबला होता. १२ मे रोजी रात्री अंकुश चिडे यांच्या शेत वस्तीवरील वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे ते रोहित्रावर गेले. त्यांनी रोहित्रावरील उडालेला फ्यूज बसविला. तेथून परत येत असतांना त्यांना गोरखनाथ माधवराव चिडे याने अटकाव केला. आमच्या शेतातून का जातोस म्हणून वाद घातला. एवढ्यात माधवराव शेकूजी चिडे व कासाबाई माधवराव चिडे हे दोघे कुºहाड व विळा हातात ेघेऊन आले. आईच्या हातातील कुºहाड घेऊन गोरखनाथ चिडे याने अंकुश चिडेवर जोरदार हल्ला चढविला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाल्याचे पाहून शेत वस्तीवरून संगीता अंकुश चिडे व संतोष भिकाजी चिडे हे धावत घटनास्थळी आले. त्यांच्यावरही हल्ला करून जखमी करण्यात आले. या सर्व जखमींना जालना येथे खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले. मात्र अंकुश भिकाजी चिडे (३५) यांची प्रकृती गंभीर असल्याने सरकारी दवाखान्यात पाठविण्यात आले. रुग्णाची गंभीर अवस्था पाहून नातेवाईकांना औरंगाबाद येथे घाटी दवाखान्यात जाण्याचा वैद्यकीय अधिकार्‍यांनी सल्ला दिला. अंकुश चिडे यांना औरंगाबादला घेऊन जात असतानाच रात्री २ वाजेच्या सुुमारास त्यांचे करमाड येथे निधन झाले. त्यामुळे नातेवाईकांनी गाडी परत फिरवून जालना येथे सरकारी दवाखान्यात मृतदेह आणला. सदर प्रकरणात तालुका जालना पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन जायभाये यांच्यासह कमलाकर अंभोरे, ज्ञानदेव नागरे यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नातेवाईकांना शांत केले. पूर्वी दाखल केलेला भादवि कलम ३०७ गुन्ह्यात भादंवि कलम ३०२ नुसार नोंद घेतली. यात आरोपी गोरखनाथ, माधवराव व कासाबाई यांना अटक करण्यात आली. अधिक तपास जायभाये करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Farmer's blood from old fiance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.