पीक विम्यासाठी गंगापूर कृषी कार्यालयासमोर शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:06 IST2021-06-09T04:06:22+5:302021-06-09T04:06:22+5:30

गंगापूर : इशारा देऊनही कृषी विभागाच्या वतीने कोणतीही कारवाई न केल्याने जि. प. चे माजी सभापती संतोष जाधव यांच्या ...

Farmers attack in front of Gangapur agriculture office for crop insurance | पीक विम्यासाठी गंगापूर कृषी कार्यालयासमोर शेतकरी आक्रमक

पीक विम्यासाठी गंगापूर कृषी कार्यालयासमोर शेतकरी आक्रमक

गंगापूर : इशारा देऊनही कृषी विभागाच्या वतीने कोणतीही कारवाई न केल्याने जि. प. चे माजी सभापती संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पीक विमा मिळण्यासाठी जोरदार आंदोलन केले. पुढील आठ दिवसांत त्रयस्थ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येईल, असे लेखी आश्वासन उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

मागील खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा मंजूर न झाल्यास कृषी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला होता. मागील आठ दिवसांत त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने मंगळवारी शेतकरी आक्रमक झाले. आंदोलक कृषी कार्यालयास टाळे ठोकणार होते. त्यामुळे परिसरात सकाळपासूनच पोलिसांचा बंदोबस्त होता. शेतकऱ्यांनी येथील कृषी कार्यालयांसमोर जोरदार निदर्शने करत चार तास आंदोलन केले. जोपर्यंत पीक विमा मंजुरीचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला.

अखेर उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश देशमुख व महसूलचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी आंदोलकांची भेट घेऊन सर्व पीक कापणी प्रयोगांची त्रयस्थ अधिकाऱ्यामार्फत पुढील आठ दिवसांत चौकशी करण्यात येईल व यामध्ये दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करून वस्तुस्थिती शासनास कळविण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. यावेळी संतोष जाधव, जि.प. सदस्य मधुकर वालतुरे, नंदकुमार गांधीले, पं.स. सदस्य सुमित मुंदडा, कृष्णा सुकाशे, दीपक बडे, आप्पासाहेब पाचपुते, अण्णासाहेब जाधव, रवी चव्हाण, अमोल जाधव, सुरेश जाधव, कृष्णकांत व्यवहारे, राजेंद्र राठोड, देवेंद्र गवारे, युवराज ताठेंसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

फोटो -

Web Title: Farmers attack in front of Gangapur agriculture office for crop insurance