शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने बळीराजा अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 20:50 IST

बागा वाळत असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देकन्नड तालुक्यातील नागद परिसरातील चित्र कृषी विभागाचे मार्गदर्शन मिळेना 

औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील नागद परिसरात कडाक्याच्या थंडीमुळे केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात बागा वाळत असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्या येथील बळीराजा अडचणीत सापडला असून, कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन मार्गदर्शन करावे, अशी मागणी केळी उत्पादन शेतकऱ्यांनी केली आहे. 

नागद परिसरात यंदा दुष्काळी परिस्थिती असूनही मोठ्या प्रमाणात येथील शेतकऱ्यांनी जीवाचे रान करून केळीचे पीक जगविले आहे; मात्र जगविलेल्या केळी पिकावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन निसटली आहे. आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये लागवड करण्यात आलेल्या कांद्याशिवाय मार्च व एप्रिलमध्ये लागवड केलेल्या मिरगाच्या बागांवरही करपाचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर काय उपाययोजना कराव्यात, याबद्दल शेतकरी संभ्रमात असून, कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

येथील शेतकऱ्यांनी लागवडीपासून, आंतरमशागत ठिबक सिंचन प्रणाली, महागडी औषधी यावर मोठा खर्च केला आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यात कापणीवर येणाऱ्या केळी बागांमध्ये डिसेंबरअखेर, तसेच जानेवारी महिन्यात कडाक्याच्या थंडीने केळी बागा करपत असून, केळीची पाने सुरुवातीला पिवळी पडत आहेत. त्यामुळे केळी पीक जवळपास हातातून गेले आहे. त्यातच सध्या भावात घसरण झाल्याने उत्पादक दुहेरी संकटात सापडले आहेत. 

केळीसाठी विमा का नाहीनागद परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळी पिकाचा विमा काढता येत नाही. त्यामुळे नागदसह वडगाव, हरसवाडी, सायगव्हाण, बोरमळी, पांगरा, पांगरातांडा, नागदतांडा, बेलखेडा, सोनवाडी या परिसरातील शेतकऱ्यांच्या केळी पिकाचे नुकसान होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे चाळीसगाव व पाचोरा (जि. जळगाव) येथील शेतकऱ्यांना तीन वर्षांपासून विम्याचा लाभ मिळत आहे, तर कन्नड तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळीसाठी विमा का दिला जात नाही, असा सवाल उपस्थित झाला आहे.

कृषी विभागाने मार्गदर्शन करावे

नागद व परिसरात केळी पिकावर मोठ्या प्रमाणावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे; मात्र तरीही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. वरिष्ठांनी दखल घेऊन मार्गदर्शन करावे, अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र