रोहित्रांच्या खराब अवस्थेने शेतकरी त्रस्त, महावितरण मात्र सुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:16 IST2021-02-05T04:16:52+5:302021-02-05T04:16:52+5:30
महावितरणच्या चुकीमुळे आडगाव सरक येथील रुस्तुम माणिकराव पठाडे या ५२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तालुक्यातील अशा खराब ...

रोहित्रांच्या खराब अवस्थेने शेतकरी त्रस्त, महावितरण मात्र सुस्त
महावितरणच्या चुकीमुळे आडगाव सरक येथील रुस्तुम माणिकराव पठाडे या ५२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तालुक्यातील अशा खराब रोहित्रांचा विषय ऐरणीवर आला. पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने जलसाठे तुडुंब भरलेले आहेत. मात्र वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिकांना पाणी देता येत नाही. रोहित्रांच्या दुरवस्थेला महावितरणकडील अपुरे मनुष्यबळ कारणीभूत असल्याचे हिवरा, लाडगाव येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शपथपत्र देऊनही दुर्लक्ष..
हिवरा शिवारातील शेतकऱ्यांचे अधिक वीज कनेक्शन आहेत. अधिक क्षमतेचे नवीन रोहित्र बसविण्यासाठी लेखी शपथपत्र दिले आहे. अधिकारी कुठल्याच हालचाली करीत नसल्याने नवीन रोहित बसविण्याची मागणी सुदाम पोफळे, अंबादास पोफळे, भाऊसाहेब पोफळे, बालाजी पोफळे आदींनी केली आहे.
वेगवेगळे रोहित्र हवे..
लाडगाव शिवारात कमी दाबाने वीज पुरवठा होतो, शिवाय अनेक वेळा रात्री लाडगावचा वीज प्रवाह खंडित होतो. त्यामुळे येथील शेतकरी व व्यावसायिकांसह नवीन रोहित्र बसविण्याची मागणी भाऊसाहेब घाडगे, उपसरपंच संतोष बागल, प्रकाश बागल, हनुमान बागल, रमेश बागल आदींनी केली आहे.
फोटो - १) करमाड शिवारातील गटनंबर २४४ शिवारात असलेल्या रोहित्राची अवस्था.
२) लाडगाव शिवारातील गट नंबर ७१ मध्ये असलेल्या रोहित्राची अवस्था...